Diwali Shopping : यंदाच्या दिवाळीत स्वदेशी वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचं दिसून येत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी विक्री जास्त प्रमाणात करण्यात आली आहे. म्हणजेच या वेळी विक्री २५% जास्त होती. भारतीयांनी चिनी वस्तूंऐवजी भारतात बनवलेल्या भारतीय वस्तूंना अधिक प्राधान्य दिल आहे.
ही भरघोस दिवाळी विक्री भारताची आर्थिक ताकद आणि आपल्या देशावरची स्वदेशी भावना दर्शवते. ही सणासुदीच्या काळातील भारताच्या व्यवसाय इतिहासातील सर्वाधिक उलाढाल आहे.
CAIT चा दिवाळी उत्सव विक्री २०२५ वरील संशोधन अहवाल राज्यांच्या राजधान्या आणि टियर २ आणि ३ शहरांसह ६० प्रमुख वितरण केंद्रांमध्ये केलेल्या व्यापक देशव्यापी सर्वेक्षणावर आधारित आहे.
दिल्लीतील चांदणी चौक येथील खासदार आणि सीएआयटीचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी जीएसटीचे तर्कसंगतीकरण आणि स्वदेशीचा अवलंब करण्यासाठी “मजबूत ब्रँड अॅम्बेसेडर” म्हणून उदयास आले, ज्यामुळे व्यापारी समुदाय आणि ग्राहकांना स्वदेशीची प्रेरणा मिळाली आहे. खंडेलवाल यांच्या माहितीनुसार, पंतप्रधानांच्या स्वदेशी दिवाळीचा लोकांवर बराच प्रभाव पडला. ७८% ग्राहकांनी परदेशी वस्तूंपेक्षा भारतीय बनावटीच्या वस्तूंना प्राधान्य दिले आहे. यामुळे चिनी वस्तूंच्या मागणीत लक्षणीय घट झाल्याचे देखील दिसून आले.
हे देखील वाचा- Nashik Crime : नाशकात रिक्षाचालकांची मुजोरी; ६० बेशिस्त चालकांना दाखवला ‘खाकी’चा दणका!