C5 Group : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जागतिक महासत्तांचा एक नवीन विशेष ‘C5’ किंवा ‘कोअर फाइव्ह’ नावाचा मंच तयार करण्याच्या विचारात आहे. याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. यामध्ये अमेरिका, रशिया, चीन, भारत आणि जपान या देशांचा समावेश असेल. या गटामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या G7 सारख्या युरोप आधारित पारंपारिक गटांना बाजूला सारले जाईल.
व्हाईट हाऊसने गेल्या आठवड्यात प्रकाशित केलेल्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणाच्या एका अप्रकाशित आणि विस्तृत आवृत्तीमध्ये या गटाची कल्पना पुढे आल्याचे सांगितले जात आहे.
C5 गटाचा उद्देश आणि योजना:
- उद्देश: हा गट श्रीमंत आणि लोकशाही शासित असण्याची G7 ची अट नसलेला, केवळ मोठ्या लोकसंख्या आणि आर्थिक शक्तींवर आधारित एक नवीन शक्तिशाली गट असेल.
- बैठका: हा गट G7 प्रमाणेच नियमितपणे शिखर बैठका घेईल.
- पहिला अजेंडा: प्रस्तावित C5 अजेंड्यावरील पहिला विषय मध्य पूर्वेकडील सुरक्षा, विशेषत: इस्रायल आणि सौदी अरेबिया यांच्यातील संबंध सामान्य करणे हा असेल.
मित्र राष्ट्रांना चिंता
व्हाईट हाऊसने या कागदपत्राच्याअस्तित्वाचा इन्कार केला असला तरी, राष्ट्रीय सुरक्षा तज्ञांना वाटते की ही कल्पना ट्रम्प यांच्या विचारांशी सुसंगत आहे. या नवीन गटाच्या निर्मितीमुळे युरोप (Europe) आणि नाटोचे (NATO) सामंजस्य कमकुवत होण्याची शक्यता आहे, अशी भीती अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांकडून व्यक्त केली जात आहे.
हे देखील वाचा – H3N2 Influenza : H3N2 इन्फ्लुएन्झा काय आहे? हिवाळ्यात आजारांपासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी? जाणून घ्या









