Donald Trump health: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोग्याबद्दलच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावर “Trump Is Dead” हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. यानंतर आता स्वतः ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.
सोशल मीडि पोस्टमध्ये त्यांनी याआधी मी कधीही एवढा चांगला नव्हतो, असे म्हणत चर्चांना पूर्ण विराम दिला.
व्हाईट हाऊसने) गेल्या आठवड्यात ट्रम्प यांचे कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम नसलेले वेळापत्रक प्रकाशित केल्याने या चर्चांना सुरुवात झाली. यावर ट्रम्प यांनी स्वतः ‘ट्रूथ सोशल’वर पोस्ट करून या चर्चा फेटाळल्या आणि ‘मी माझ्या आयुष्यात कधीच इतके चांगले वाटले नाही’ असे म्हटले आहे.
अफवांचे कारण आणि राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया
ट्रम्प यांच्या आरोग्याबद्दलच्या चर्चांना अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वान्स यांनी एका मुलाखतीत ‘जर एखादी मोठी दुर्घटना घडली, तर मी राष्ट्राध्यक्षपद स्वीकारण्यास तयार आहे’ असे म्हटले होते. यामुळे या अफवांना आणखी बळ मिळाले. तसेच, ‘द सिम्पसन्स’ या लोकप्रिय टीव्ही शोच्या निर्मात्यांनीही शोचा शेवट डोनाल्ड ट्रम्प यांच्या मृत्यूनंतर होईल, असे वक्तव्य केले होते.
या अफवांना उत्तर म्हणून ट्रम्प यांनी गोल्फ खेळतानाचा आपला फोटो पोस्ट केला, मात्र काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तो फोटो ‘बनावट’ असल्याचे म्हटले.
आरोग्य समस्या आणि स्पष्टीकरण
गेल्या काही महिन्यांपासून ट्रम्प यांच्या आरोग्याबद्दल चर्चा सुरू आहेत. त्यांच्या हातावर एक मोठी जखम दिसली होती, तर काही दिवसांनंतर त्यांचा पाय सुजल्याचे फोटोही व्हायरल झाले होते. यावर व्हाईट हाऊसने स्पष्टीकरण दिले होते की, सतत हस्तांदोलन केल्यामुळे जखम झाली आहे, तर पाय सुजणे हा क्रोनिक व्हेनस इन्सफिशियन्सी नावाच्या आजारामुळे आहे.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
ऑस्ट्रेलियात भारतीयांविरोधात हजारो नागरिक उतरले रस्त्यावर, नक्की कारण काय? जाणून घ्या
फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी मराठा आंदोलकांना मदत करता का? एकनाथ शिंदे म्हणाले…
खानचंदानींच्या मृत्यूला उबाठा नेता जबाबदार! पतीचा पत्रकार परिषदेत आरोप