Home / देश-विदेश / Trump India Visit : ट्रम्प लवकरच भारतात येणार? स्वतः माहिती देत म्हणाले…

Trump India Visit : ट्रम्प लवकरच भारतात येणार? स्वतः माहिती देत म्हणाले…

Trump India Visit : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे कौतुक करतानाच, लवकरच...

By: Team Navakal
Trump India Visit
Social + WhatsApp CTA

Trump India Visit : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे कौतुक करतानाच, लवकरच भारत भेटीवर (India Visit) येण्याचे संकेत दिले आहेत.

त्यांनी पंतप्रधान मोदींना ‘एक महान व्यक्ती’ आणि ‘मित्र’ म्हणून संबोधले. दोन्ही देशांमधील महत्त्वाचे व्यापारी संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने आपण पुढील वर्षी भारतात येऊ शकतो, असे ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये (White House) पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ट्रम्प यांना पुढील वर्षी भारत दौऱ्यावर येण्याची योजना आहे का, असा थेट प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी, “होय, असे घडू शकते,” असे सकारात्मक उत्तर दिले.

मोदींनी भारत भेटीचे निमंत्रण दिल्याचे ट्रम्प यांचे विधान

ट्रम्प म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी एक महान व्यक्ती आहेत. ते माझे मित्र आहेत आणि आमचे बोलणे होते. मी भारतात यावे, अशी त्यांची इच्छा आहे. आम्ही याबाबत नक्कीच निर्णय घेऊ, मी तिथे जाईन… पंतप्रधान मोदी महान आहेत आणि मी भारत भेटीवर येत आहे.”

ट्रम्प यांच्या मते, पंतप्रधान मोदींनी रशियाकडून मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी करणे थांबवले आहे. हे दोन्ही देशांच्या व्यापार संबंधांसाठी सकारात्मक पाऊल आहे.

मागील तणावानंतर ट्रम्प यांच्या भूमिकेत बदल

भारताने रशियन तेल खरेदी सुरू ठेवल्यामुळे अमेरिकेने भारतावर 50% (अतिरिक्त 25% सह) शुल्क लादण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर दोन्ही देशांतील व्यापार संबंधात तणाव निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर, न्यूयॉर्क टाइम्सच्या ऑगस्टच्या एका अहवालात ट्रम्प Quad परिषदेसाठी भारतात येणार नसल्याचे वृत्त होते. मात्र, आता ट्रम्प यांनी स्वतः भारत भेटीची इच्छा व्यक्त केल्याने दोन्ही देशांच्या संबंधात सुधारणा होत असल्याचे संकेत मिळत आहेत.

भारताच्या ऊर्जा धोरणावर परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण

दरम्यान, यापूर्वी ट्रम्प यांनी भारताने रशियन तेलाची खरेदी कमी केल्याचा दावा केला होता. यावर भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे (MEA) प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केले होते की, भारताचे ऊर्जा खरेदीचे निर्णय पूर्णपणे राष्ट्रीय हित आणि ग्राहकांच्या कल्याणावर आधारित आहेत.

जयस्वाल म्हणाले, “भारतासाठी तेल आणि वायूची आयात करणे ही मोठी गरज आहे. अस्थिर ऊर्जा बाजारात भारतीय ग्राहकांचे हित जपणे हे आमचे उद्दिष्ट असते. अमेरिकेसोबत आम्ही ऊर्जा खरेदी वाढवण्यास उत्सुक आहोत आणि सध्या याबाबत चर्चा सुरू आहेत.”

हे देखील वाचा – Mahar Watan Land : काय आहे ‘महार वतन जमीन’ आणि तिचा इतिहास? पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहारावरून राजकीय वादळ

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या