Home / देश-विदेश / Donald Trump Claims: “दोघांनाही फोन केला आणि युद्ध थांबवलं”; डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत-पाकिस्तान वादावर पुन्हा एकदा अजब दावा

Donald Trump Claims: “दोघांनाही फोन केला आणि युद्ध थांबवलं”; डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत-पाकिस्तान वादावर पुन्हा एकदा अजब दावा

Donald Trump Claims: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान दरम्यान मे 2025 मध्ये झालेल्या लष्करी तणावाबाबत पुन्हा एकदा...

By: Team Navakal
Donald Trump
Social + WhatsApp CTA

Donald Trump Claims: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान दरम्यान मे 2025 मध्ये झालेल्या लष्करी तणावाबाबत पुन्हा एकदा खळबळजनक विधान केले आहे. एका कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांनी दावा केला की, त्यांनी दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करून संभाव्य युद्ध रोखले. मात्र, भारताने यापूर्वीच कोणत्याही तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

विमाने पाडल्याच्या आकड्यांमध्ये तफावत

‘बोर्ड ऑफ पीस’ कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांनी सांगितले की, “दोन्ही देशांची 11 विमाने पाडली गेली. ही अत्यंत महागडी विमाने होती. जेव्हा खूप पैशांचे नुकसान होऊ लागले, तेव्हा त्यांनी युद्ध नको असल्याचा निर्णय घेतला.” विशेष म्हणजे, ट्रम्प यांनी विमाने पाडल्याचा आकडा प्रत्येक वेळी बदलला आहे.

गेल्या वर्षी त्यांनी 5 विमाने पाडल्याचे म्हटले होते. ऑगस्टमध्ये हा आकडा 7 वर गेला, तर नोव्हेंबरमध्ये तो 8 झाला. या महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी 10 विमाने पाडली गेल्याचे सांगितले आणि आता हा आकडा 11 वर पोहोचला आहे.

    भारताने ट्रम्प यांचा हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला असून अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

    व्यापार कराराची दिली होती धमकी?

    युद्ध थांबवण्यासाठी आपण व्यापाराचा शस्त्र म्हणून वापर केल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. “मी दोन्ही देशांना फोन केला आणि सांगितले की, जर तुम्ही हा वाद मिटवला नाही, तर मी तुमच्याशी कोणतेही व्यापारी करार करणार नाही. तसेच तुमच्या देशांतील वस्तूंवर 200 टक्के आयात शुल्क लावेन,” असा दावा त्यांनी केला.

    पंतप्रधान मोदींचा उल्लेख

    कार्यक्रमादरम्यान ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही उल्लेख केला. “माझे पंतप्रधान मोदींशी बोलणे झाले आहे. ते खूप उत्साही आहेत आणि सध्या आपल्याला पाहत आहेत,” असे ट्रम्प यांनी नमूद केले. गेल्या काही महिन्यांत ट्रम्प यांनी जवळपास 80 पेक्षा जास्त वेळा भारत-पाकिस्तान संघर्ष आपणच थांबवल्याचा दावा केला आहे.

    हे देखील वाचा – MLA Ramdas Masram Case: मुरुम उत्खननावरून राडा! काँग्रेस आमदारासह 6 जणांवर गुन्हा; मजुराला मारहाण केल्याचा आरोप

    Web Title:
    संबंधित बातम्या