Donald Trump Tariffs: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेतील एका न्यायालयाने त्यांचे बहुतांश टॅरिफ धोरण (Donald Trump Tariffs) बेकायदेशीर ठरवले आहे.
ट्रम्प यांच्यासाठी हा त्यांच्या आर्थिक धोरणाला मोठा झटका मानला जात आहे. कोर्टाने निकाल दिला असला तरी, ट्रम्प यांना सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी 14 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत परतल्यापासून कठोर टॅरिफ धोरण राबवले आहे. भारतासह अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात करत लादण्यात आला आहे. यावरून त्यांच्यावर टीका होत आहे.
या निकालावर ट्रम्प यांनी प्रतिक्रिया देत, कोर्टाला ‘अत्यंत पक्षपाती’ म्हटले आहे. ‘सर्व टॅरिफ अजूनही लागू आहेत! आज एका अत्यंत पक्षपाती अपीलीय कोर्टाने चुकीचा निर्णय दिला की आमचे टॅरिफ हटवले पाहिजेत, पण त्यांना माहीत आहे की शेवटी अमेरिकेचाच विजय होईल,’ असे ट्रम्प म्हणाले.
ट्रम्प पुढे म्हणाले की, ‘जर हे टॅरिफ हटवले गेले तर देशासाठी ही एक मोठे संकट असेल. यामुळे आपण आर्थिकदृष्ट्या कमकुवत होऊ आणि आपल्याला मजबूत राहायचे आहे. अमेरिका आता इतर देशांनी, मग ते मित्र असोत वा शत्रू, लादलेले मोठे व्यापार तूट आणि अन्यायकारक टॅरिफ यापुढे सहन करणार नाही. जर हा निर्णय कायम राहिला तर तो अमेरिकेला पूर्णपणे नष्ट करेल.’
कोर्टाचा निर्णय काय होता?
वॉशिंग्टन, डीसीमधील फेडरल सर्किटसाठीच्या अमेरिकन अपील कोर्टाने निकाल दिला की, डोनाल्ड ट्रम्प यांनी आणीबाणीच्या अधिकारांतर्गत टॅरिफ लादताना आपल्या अधिकारांचे उल्लंघन केले.
कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले की, ‘आणीबाणी जाहीर झाल्यावर राष्ट्रपतींना अनेक महत्त्वपूर्ण अधिकार मिळतात, पण त्यात टॅरिफ किंवा करांचे अधिकार स्पष्टपणे समाविष्ट नाहीत.’
हा निर्णय ट्रम्प यांचे टॅरिफशी संबंधित निर्णय रद्द करतो. तसेच, चीन, कॅनडा आणि मेक्सिकोवर फेब्रुवारीमध्ये लादलेल्या टॅरिफवरही या निर्णयाचा परिणाम होईल. मात्र, इतर कायद्यांनुसार लादलेले स्टील आणि अॅल्युमिनियमवरील टॅरिफ कायम राहतील.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
TikTok India: ‘टिकटॉक’ची भारतात नोकरभरती सुरू, कंपनीची पुन्हा एन्ट्री होणार की केवळ अफवा?
Gokul Milk Price: बाप्पा पावला! गोकुळ दूध संघाचा मोठा निर्णय; दुधाच्या खरेदी दरात वाढ
‘मराठा समाजाचे बांधव….’; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर रितेश देशमुखची प्रतिक्रिया; म्हणाला…