Donald Trump : ट्रम्प यांच्या दिवसागणिक भारताविषयी बदलणार्या अनाकलनीय आणि अतिशय विरोधाभासी भूमिका! आतापर्यंत भारताच्या (INDIA) रशियन (RUSSIA)तेलखरेदीला कडाडून विरोध करणार्या ट्रम्प यांनी ‘मी मोदींच्या राजकीय कारकिर्दीला धक्का लावू इच्छित नाही’ असे विरोधाभास निर्माण करणारे वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यांचे हे विधान फक्त पंतप्रधान मोदींपुरतेच मर्यादित न राहता, ते भारतावर केलेले वक्तव्य सुद्धा आहे. पण, ट्रम्प (Donald Trump) यांच्या दबावतंत्रापुढे भारत यापूर्वीही झुकलेला नाही आणि भविष्यातही झुकणार नाही असा द्रुढ विश्वास भारत वासियांना आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या अलीकडच्या काही विधानांमध्ये राजनैतिक परिपक्वतेपेक्षा प्रसिद्धतेचा थाटच अधिक दिसून येतो. ते नुकतेच म्हणाले की, “भारत लवकरच रशियाकडून तेलखरेदी थांबवेल” त्याचवेळी पंतप्रधान मोदी यांच्याविषयी प्रेम व्यक्त करत, “मी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला धक्का लावू इच्छित नाही,” असे म्हणत एकप्रकारे भारताला अप्रत्यक्ष धमकावण्याचेच काम देखील त्यांनी केले. पण, त्यांच्या या दोन्ही वाक्यात प्रचंड विरोधाभास देखील जाणवला.
भारताने रशियन तेलखरेदीबाबत घेतलेले धोरण अत्यंत व्यावहारिक असेच आहे. परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की, भारतीय ग्राहकांचे हित आणि ऊर्जासुरक्षा जोपासणे यालाच आमचे प्रथम प्राधान्य राहील. रशियाकडून आयात होणारे स्वस्त तेल हे भारताच्या इंधनसाखळीतील महत्त्वाचा घटक ठरले असून, रशिया प्रतिबॅरल सवलतीच्या दरात भारताला कच्चे तेल पुरवतो; त्यामुळे भारताला आर्थिक स्थैर्य आणि आर्थिक समतोल राखता येतो. जगभरात इंधनाच्या किमतीत मोठ्या प्रमाणावर वाढत असताना, भारतीय बाजारपेठेत त्या गेल्या तीन वर्षांपेक्षा अधिक काळ स्थिर आहेत.
२०२४-२५ दरम्यान भारताच्या एकूण तेलआयातीत रशियाचा वाटा सुमारे ३४ ते ३६ टक्के इतका होता. शिवाय इराक, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती हे अनुक्रमे दुसर्या-तिसर्या क्रमांकावर आहेत. ट्रम्प यांचा भारताच्या रशियन तेलखरेदीवर असलेला आक्षेप हा पूर्णपणे राजकीय स्वरुपाचाच मनला जातो. कारण, अमेरिका आजही कुठेनाकुठे रशियन ऊर्जेवर काही प्रमाणात अवलंबून आहे. युरोपमधील अमेरिकी सहयोगी देश आजही याच रशियन गॅस आणि इंधनावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. भारताने स्वस्तात तेल खरेदी केल्याने अमेरिकी कंपन्यांचा नफा घटतो, हीच ट्रम्प यांची यशोगाथा आहे . असे असतानाही भारतावर टीका करणे, हा ट्रम्प यांचा ढोंगीपणा आहे.
दुसरीकडे मात्र पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांच्या उथळ व्यक्तव्यांना प्रतिसाद देण्याचे टाळले. भारतातील सामान्य जनतेच्या मते पंतप्रधानांनी ट्रम्प याना सडेतोड उत्तर द्यावे. ट्रम्प यांचा भारताविषयीचा खोटा आशावाद हा तोडावा.असे सामान्य जनतेला वाटते. शिवाय लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा दावा असा की, मोदी अमेरिकेच्या मार्गदर्शनाखाली आपले निर्णय घेतात. यात कितपत तथ्यता आहे हे येणाऱ्या काळात समजेलच..
हे देखील वाचा – Tata motors:अखेर टाटा मोटर्सचे विभाजन झाले !कोसळणार्या शेअरना आणखी धक्का