Donald Trump – राष्ट्राध्यक्ष पदाची सुत्रे दुसऱ्यांदा हाती आल्यापासून जगाला वारंवार धमकावणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)पुन्हा एकदा बेताल वक्तव्य केले आहे. संपूर्ण जगाचा दीडशे वेळा विनाश करू शकेल एवढी अण्वस्त्रे अमेरिकेकडे (America) आहेत,अशी अप्रत्यक्ष धमकी ट्रम्प यांनी दिली आहे.
गेल्या आठवड्यात दक्षिण कोरिया (South Korea) मध्ये आसियान शिखर परिषदेच्या निमित्ताने ट्रम्प यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग (Xi Jinping) यांची भेट घेतली होती. या भेटीच्या आधीच त्यांनी आपल्या शास्त्रज्ञांना अण्वस्त्र चाचण्या करण्याचे आदेश दिले होते. तेव्हापासून जगभरात मोठा वादंग उठला आहे.ट्रम्प यांच्या या आदेशावर जगभरातून टीका झाली.
मात्र ट्रम्प आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले की, रशियाने अण्वस्त्र चाचण्या घेण्याची घोषणा केली आहे. ते आता अण्वस्त्र चाचण्या करूही लागले आहेत. उत्तर कोरियासुध्दा अणु चाचण्या करत आहे. पाकिस्तान अणु चाचण्या करत आहे. त्यामुळेच भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. या परिस्थितीत अमेरिकेने अण्वस्त्र चाचण्यांबाबत मागे राहणे शक्य नाही. अख्ख्या जगाचा दीडशे वेळा विनाश करता येईल एवढी अण्वस्त्रे अमेरिकेकडे आहेत.
हे देखील वाचा –
								
								
								
								
								
				
															
								
								
								
								
								
								








