Home / देश-विदेश / ‘आता त्यांना मारणार नाही, पण…’; इराणच्या सर्वोच्च नेत्याला ट्रम्प यांचा थेट इशारा; अटीशिवाय शरण येण्याचा अल्टिमेटम

‘आता त्यांना मारणार नाही, पण…’; इराणच्या सर्वोच्च नेत्याला ट्रम्प यांचा थेट इशारा; अटीशिवाय शरण येण्याचा अल्टिमेटम

Israel Iran Conflict | इस्रायल आणि इराण (Iran-israel War) यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर जोरदार हल्ले केले...

By: Team Navakal
Israel Iran Conflict

Israel Iran Conflict | इस्रायल आणि इराण (Iran-israel War) यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर जोरदार हल्ले केले आहेत. त्यातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Ali Khamenei) यांना थेट इशारा देत शरण यावे असे म्हटले आहे.

ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्मवर लिहिले की, खामेनेई कुठे लपले आहेत हे त्यांना माहीत आहे. मात्र,आत्तापुरते तरी त्यांना मारणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले. हा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी खामेनेई यांना संपवल्यास संघर्ष थांबेल, असे सुचवल्यानंतर आला आहे.

ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले, “आम्हाला माहीत आहे की तथाकथित सुप्रीम लीडर कुठे लपले आहेत. ते सोपे लक्ष्य आहेत, पण आम्ही त्यांना आता संपवणार नाही. तरीही, इराणने नागरिकांवर किंवा अमेरिकन सैनिकांवर मिसाईल हल्ले करू नयेत. आमचा संयम संपत चालला आहे.” दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी “बिना अट शरणागती!” असे लिहून इराणला थेट अल्टिमेटम दिला.

इस्रायल-इराण तणाव वाढला

इस्रायलने ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ अंतर्गत इराणच्या अणु आणि लष्करी सुविधांवर हल्ले केल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. इस्रायलचा दावा आहे की, इराण अणुबॉम्ब मिळवण्याच्या जवळ आहे, आणि त्यांना रोखण्यासाठी हे हल्ले आवश्यक आहेत.

इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांचा इशारा

इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनीही खामेनेई यांना इराकी राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन यांची आठवण करून दिली. सद्दाम यांना सत्तेतून खाली खेचून फाशी देण्यात आली होती. काट्झ म्हणाले, “इराणच्या हुकूमशहाने युद्ध गुन्हे आणि इस्रायली नागरिकांवर मिसाईल हल्ले सुरू ठेवल्यास त्यांचेही तेच नशीब असेल.” त्यांनी इराणला इस्रायलविरुद्ध आक्रमक कारवाया थांबवण्याचा इशारा दिला.

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या

Share:

More Posts