Home / देश-विदेश / ‘बाबरी मशीद बांधणे हेच ‘मूळ अपवित्रतेचे कृत्य’; माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांचे मोठे विधान

‘बाबरी मशीद बांधणे हेच ‘मूळ अपवित्रतेचे कृत्य’; माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांचे मोठे विधान

DY Chandrachud on Babri Masjid Verdict: भारताचे माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी नुकत्याच एका मुलाखतीत बाबरी मशीद व राम...

By: Team Navakal
DY Chandrachud on Babri Masjid Verdict

DY Chandrachud on Babri Masjid Verdict: भारताचे माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी नुकत्याच एका मुलाखतीत बाबरी मशीद व राम मंदिराच्या निकालावर मोठे विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

16व्या शतकात अयोध्येत बाबरी मशीद उभी करणे हेच त्या जागेवर झालेले सर्वात मोठे आणि पहिले अपवित्र कृत्य होते, असे त्यांनी म्हटले आहे. याच जागेवर आता राम मंदिर उभे आहे.

9 नोव्हेंबर 2019 रोजी अयोध्या वादावर निकाल देणाऱ्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाचा चंद्रचूड हे भाग होते. या निर्णयानुसार वादाची जागा राम मंदिरासाठी देण्यात आली आणि मुस्लिमांना मशीद बांधण्यासाठी अयोध्येत 5 एकरचा वेगळा भूखंड देण्याचे निर्देश देण्यात आले होते.

निकालावर टीका झाल्यावर दिले स्पष्टीकरण

या निकालावर काही टीका झाली होती. त्यानंतर आता चंद्रचूड यांनी हे मत मांडले. ASI (Archaeological Survey of India) च्या अहवालात मशीदीखाली एक रचना ढळली होती, पण ती पाडून मशीद बांधल्याचा पुरावा नव्हता. तसेच, त्या रचनेत आणि मशीद बांधणीत 4 शतकांचे अंतर होते.

याबद्दल बोलताना चंद्रचूड म्हणाले, “जेव्हा तुम्ही म्हणता की हिंदूंनी आतील आवारात विटंबना केली, तेव्हा मशीद उभी करण्याचे मूलभूत कृत्य कसे विसरता येईल? इतिहासात काय झाले, हे आपण विसरू शकत नाही.” पुरातत्व उत्खननातून पुरेसा पुरावा मिळाला होता, असे त्यांनी सांगितले.

‘Newslaundry’ ला दिलेल्या मुलाखतीत चंद्रचूड म्हणाले, “त्या जागेवर झालेले मूळ अपवित्रतेचे कृत्य म्हणजेच 16व्या शतकात त्या मशीदीचे बांधकाम होय. आपण इतिहासात जे घडले ते दुर्लक्षित करू शकत नाही किंवा विसरू शकत नाही.”

निकालातील पुरावे आणि टीकाकारांचे दुर्लक्ष

2019 चा अयोध्या निकाल देताना, खंडपीठाने पुरातत्त्वीय पुराव्यांचा आधार घेतला होता. याबद्दल बोलताना चंद्रचूड यांनी सांगितले की, पुरातत्व खात्याच्या अहवालात मशीदीखाली मंदिराचे अवशेष असल्याचे सिद्ध झाले आहे. “इतिहासात जे काही झाले ते पुराव्याच्या स्वरूपात आपल्यासमोर आहे, ते आपण नजरेआड करू शकत नाही,” असे ते म्हणाले.

दरम्यान, पत्रकाराने यावर आक्षेप घेत, निकालात स्पष्टपणे म्हटले होते की, मशीद बांधण्यासाठी मंदिर पाडण्यात आले, याचे ठोस पुरावे नाहीत, तसेच मशीद आणि खालच्या रचनेत शतकांचा मोठा फरक होता. यावर चंद्रचूड यांनी प्रत्युत्तर दिले की, पुरातत्व खात्याचा अहवाल हा स्वतः एक पुरावा आहे आणि त्याचे मूल्यांकन कसे करायचे, हा कायदेशीररीत्या वेगळा प्रश्न आहे. ते म्हणाले, “निकालावर टीका करणाऱ्या लोकांनी निकाल व्यवस्थित वाचलेला नाही. ते फक्त त्यांच्या सोयीचा इतिहास निवडतात आणि बाकी सर्व विसरतात.”

1992 मधील विध्वंस चुकीचाच

दरम्यान, 1992 मध्ये बाबरी मशीद पाडणे हे कृत्य योग्य होते का, या प्रश्नावर त्यांनी ते अजिबात समर्थनीय नसल्याचे स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पुराव्यावर आणि प्रतिकूल ताबा या कायदेशीर नियमावर आधारित होता, असे त्यांनी सांगितले.

या विधानामुळे काही वकील आणि कार्यकर्त्यांनी टीका केली आहे. वकील प्रशांत भूषण यांनी चंद्रचूड यांच्यावर ‘जातीयवादी मानसिकता’ उघड केल्याचा आरोप केला आहे.

हे देखील वाचा – Ajit Pawar : ‘आम्ही काय इथं गोट्या खेळायला आलोय का?’; पूरग्रस्तांसमोर कर्जमाफीचा प्रश्न येताच अजित पवार संतापले

Web Title:
संबंधित बातम्या