Earthquakes In America – इस्रायल (Israel) आणि अमेरिकेसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज इराणची (Iran) जमीन भूकंपामुळे हादरली. देशातील गेराश भागात रिश्टर स्केलवर 4.3 तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाचे केंद्र जमिनीखाली सुमारे 10 किलोमीटर खोल होते. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली.
तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेतील अणुचाचण्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या एरिया 51 (Area 51)या अतिगोपनीय तळाजवळ रहस्यमय भूकंपांची मालिका नोंदवली गेली आहे.त्यामुळे अमेरिकेने अण्वस्त्र चाचणी केल्याची चर्चा होऊ लागली आहे.अमेरिकेच्या नेवाडा राज्यातील परिसरात 2.5 पेक्षा जास्त तीव्रतेचे 16 मध्यम स्वरूपाचे (16 moderate)धक्के नोंदवले आहेत. हा परिसर ‘एरिया 5१ म्हणून ओळखला जातो. एरिया 5१ आणि. एरिया 5२ हे दोन्ही तळ लासवेगासच्या उत्तरेला असलेल्या लष्करी संकुलाचा (Military complex north of Las Vegas.) भाग आहेत.
या दुर्गम भागात अमेरिकन लष्कराने प्रायोगिक विमान चाचण्या तसेच अण्वस्त्र संशोधन केल्याची चर्चा अनेक दशकांपासून आहे. शास्त्रज्ञांनी मागील एका आठवड्यात टोनोपाह टेस्ट रेंजपासून 50 मैलांच्या परिसरात 100 हून अधिक भूकंपीय हालचाली नोंदवल्या आहेत. हे धक्के 1.0 ते 1.9 तीव्रतेच्या सौम्य कंपनांपासून ते 3.0 पेक्षा जास्त तीव्रतेच्या भूकंपांपर्यंत होते. 2.5 ते 4.9 तीव्रतेचे भूकंप काही कि.मी परिसरात स्पष्टपणे जाणवू शकतात, मात्र साधारणतः इमारतींना मोठे नुकसान होत नाही. सध्या कोणतीही जीवितहानी नोंदवलेली नाही.
हे देखील वाचा –
भारत पुन्हा युद्धाची तयारी करत आहे’; पाकिस्तानच्या राष्ट्रपतींचे खळबळजनक विधान
इराणसोबतचे युद्ध किती दिवस चालणार? डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान











