Home / देश-विदेश / ईडीची अंदमानला पहिली धाड काँग्रेसच्या माजी खासदारांवर कारवाई

ईडीची अंदमानला पहिली धाड काँग्रेसच्या माजी खासदारांवर कारवाई

पोर्ट ब्लेयर- अंदमान व निकोबार (Andaman – Nicobar) राज्य सहकारी बँकेतील (State Cooperative Bank) कथित २०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी...

By: Team Navakal
ED raid in Andaman- Nicobar

पोर्ट ब्लेयर- अंदमान व निकोबार (Andaman – Nicobar) राज्य सहकारी बँकेतील (State Cooperative Bank) कथित २०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी ईडीने (ED) विविध ठिकाणी धाडी मारल्या. अंदमान व निकोबार बेटावर ईडीने केलेली ही पहिलीच कारवाई आहे.


काँग्रेसचे (Congress) माजी खासदार व बँकेचे उपाध्यक्ष कुलदीप राय शर्मा (Kuldeep Rai Sharma) यांच्या अंदमानमधील ९ तर कोलकात्यातील २ ठिकाणांवर धाडी मारल्या. पोर्ट ब्लेयर (Port Blair) मधील धाडींमध्ये या बँकेत झालेल्या गैरव्यवहारांशी संबंधित अनेक कागदपत्रे जप्त केल्याचे ईडीने म्हटले. अंदमान व निकोबारच्या आर्थिक गुन्हे शाखेने या संदर्भात गुन्हा नोंदवला होता. या बँकेत काही बोगस कंपन्या स्थापन करुन त्याद्वारे नियमबाह्य कर्ज व ओव्हरड्राफ्ट सेवा देण्यात आल्याचे तपासात आढळले आहे. कुलदीप राय शर्मा यांच्याशी संबंधित या कंपन्या असून त्याचा लाभ त्यांना झाल्याचे ईडीला आढळले आहे.


ईडीची ही कारवाई काँग्रेसच्या प्रमुख नेत्यावर करण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा या कारवाई विषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही एका सुनावणी दरम्यान ईडीच्या कारवायांवर कठोर ताशेरे ओढले होते.

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या