Mamata banerjee – पश्चिम बंगालच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. त्याआधीच येथे घमासान सुरू झाले आहे.सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुख आणि ‘इंडियन पॉलिटिकल ॲक्शन कमिटी’(आय पॅक) या राजकीय सल्लागार कंपनीचे सहसंस्थापक प्रतिक जैन यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयावर आज ईडीने छापे टाकले. 2022 च्या तक्रारीवरून म्हणजे तब्बल तीन वर्षांनंतर ईडीने छापे टाकले. छाप्याची माहिती समजताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (mamata banerjee) संतप्त होऊन तेथे पोहोचल्या. तेथून त्यांनी हिरव्या रंगाची फाईल आणि हार्ड डिस्क स्वतःच्या ताब्यात घेतली. माझ्या उमेदवारांची माहिती त्यात होती असे सांगत माझ्या पक्षाची गोपनीय माहिती भाजपाला देण्यासाठी हा छापा टाकल्याचा आरोप बॅनर्जी यांनी केला.
हातात फाईल पकडूनच पत्रकारांशी बोलताना ममता बॅनर्जी यांनी आरोप केला की, देश सुरक्षित ठेवू न शकणारे हे खोडकर आणि घाणेरडे गृहमंत्री यामागे आहेत. अमित शहांना आमच्या पक्षाची उमेदवार यादी गोळा करायची आहे. एका बाजूला मतदारांची नावे हटवली जात आहेत आणि दुसऱ्या बाजूला कागदपत्रे जप्त केली जात आहेत. माझ्या पक्षाची कागदपत्रे घेत आहेत. तिथे कोणतेही सुरक्षा रक्षक नव्हते. उमेदवार यादी, पक्षाची रणनीती आणि योजना जप्त करणे हे ईडी आणि गृहमंत्र्यांचे कर्तव्य आहे का? जर मला भाजपाची कागदपत्रे मिळाली तर त्याचा परिणाम काय होईल? छाप्याची माहिती मिळताच मी स्वतः हस्तक्षेप केला. प्रतीक माझ्या पक्षाच्या कामकाजाची जबाबदारी सांभाळतात.
दुसऱ्या बाजूला ईडीने म्हटले आहे की, काही संवैधानिक पदांवर बसलेले लोकांनी कागदपत्रे हिसकावून घेतली. (आय पॅक) कार्यालयावर छापे पूर्णपणे पुराव्यांच्या आधारे टाकले आहेत. हे कोणत्याही राजकीय पक्षाशी किंवा निवडणुकीशी संबंधित प्रकरण नाही. ही कारवाई बेकायदेशीर कोळसा तस्करी आणि मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित केसमध्ये होत असून, त्याची सध्या 10 ठिकाणी झडती सुरू आहे. त्यातील 6 पश्चिम बंगालमध्ये आणि 4 दिल्लीमध्ये ठिकाणे आहेत. चौकशीत, हवाला व्यवहाराशी संबंधित ठिकाणांचा समावेश आहे. गुन्ह्याच्या उत्पन्नाचा माग काढताना तो गोवा निवडणुकांसाठी आय पॅककडे वळवण्यात आल्याचे आढळले. कोळसा चोरीतून मिळालेली गुन्ह्याची रक्कम गोव्याला वळवून 2022 मध्ये गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये तृणमूलसाठी काम करण्यासाठी आय पॅकला देण्यात आली. कोणत्याही पक्षाच्या कार्यालयाची झडती घेण्यात आलेली नाही. मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी ईडीच्या फॉरेन्सिक टीमविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची घोषणा केली आहे. त्याच्या प्रत्युत्तरात ईडीनेही कोलकाता उच्च न्यायालयाचे दार ठोठावले असून या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती सुवरा घोष यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी होणार आहे.
इंडियन पॉलिटिकल ॲक्शन कमिटी (आय पॅक) ही राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी स्थापन केली असून, भारतातील एक प्रमुख राजकीय सल्लागार आणि प्रचार व्यवस्थापन संघटन आहे. जे निवडणूक प्रचाराला नवे रूप देण्यासाठी आणि राजकीय नेत्यांना तळागाळातील लोकांशी जोडण्यासाठी, डेटा-आधारित धोरणे आणि तंत्रज्ञानाचा वापर करून मदत करते. ‘आय पॅक’ चे प्रतीक जैन यांच्या निवासस्थानी आणि सॉल्ट लेक सेक्टर 5 मधील गोडरेज वॉटरसाईड इमारतीतील कार्यालयात छापे टाकले. प्रतीक जैन यांना ममता बॅनर्जी यांच्या निवडणूक रणनीती टीममधील महत्त्वाचा सदस्य मानले जाते. छाप्यांची बातमी पसरताच तृणमूल काँग्रेसचे नेते सॉल्ट लेक येथील कार्यालयाबाहेर जमू लागले. तणाव वाढत असताना बिधाननगर पोलीस आयुक्तही घटनास्थळी पोहोच
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा –
निवडणूक तोंडावर पेडणेकर अडचणीत? प्रतिज्ञापत्रातील माहिती लपवल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप









