Eiffel Tower Demolition Rumours: फ्रान्सचे सर्वात मोठे आणि प्रतिष्ठित पर्यटन स्थळ असलेला आयफेल टॉवर २०२६ मध्ये पाडला जाणार असल्याच्या अफवा सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. याच महिन्यात तांत्रिक अडचणींमुळे हा ऐतिहासिक टॉवर तात्पुरता बंद ठेवण्यात आला होता, ज्यामुळे या निराधार चर्चांना अधिक बळ मिळाले.
पण या अफवा पसरण्यामागे नेमके कारण काय आहे आणि त्यातील सत्य काय आहे, हे आपण पाहूया.
Eiffel Tower Demolition Rumours: आयफेल टॉवर पाडण्याच्या अफवा कशा पसरल्या?
आयफेल टॉवर २०२६ मध्ये पाडून त्या जागी ‘विशाल स्लाइड’ (मोठी घसरगुंडी) किंवा कॉन्सर्ट हॉल बनवला जाणार आहे, अशा पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहेत.
काही महिन्यांपूर्वीच ‘टॅपियोका टाइम्स’ नावाच्या एका उपरोधिक वृत्तसंस्थेने एक विनोदी लेख प्रकाशित केला. या लेखात एका खोट्या प्रवक्त्याच्या हवाल्याने म्हटले होते की, “टॉवरची लोकप्रियता आता कमी झाली आहे आणि तिथे कोणीही जात नाही, म्हणून आम्ही तो बंद करत आहोत.”
या अहवालात पर्यटकांची संख्या घटणे, ३३० मीटर उंचीच्या टॉवरजवळ ड्रोनची वाढलेली हालचाल आणि कबूतरांचा उपद्रव अशी खोटी कारणे दिली होती.
हा लेख सोशल मीडियावर झपाट्याने पसरला. अनेकांना हा दावा खरा देखील वाटला.
दरम्यान, आयफेल टॉवरचे व्यवस्थापन पाहणाऱ्या ‘सोसायटी डी’एक्स्प्लॉइटेशन डी ला टूर आयफेल’ (एसईटीई) या कंपनीने या व्हायरल अफवांवर कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. मात्र, पॅरिस शहर जगातील या सर्वात प्रसिद्ध स्मारकाला पाडणार असल्याचा कोणताही विचार नाही. एसईटीईनुसार, दरवर्षी ६० लाखांहून अधिक पर्यटक आयफेल टॉवरला भेट देतात. हे पर्यटन स्थळ बंद झाल्यास पॅरिसच्या पर्यटन उद्योगावर मोठा परिणाम होईल.
हे देखील वाचा – Diabetes Health Tips: डायबिटीस असणाऱ्यांनी दिवाळीत गोड खाताना काय काळजी घ्यावी? लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी
.