Home / देश-विदेश / Election Commission : निवडणूक गैरप्रकाराविषयीच्या आरोप प्रत्यारोपण ब्रेक नाही..

Election Commission : निवडणूक गैरप्रकाराविषयीच्या आरोप प्रत्यारोपण ब्रेक नाही..

Election Commission : संपूर्ण भारतात निवडणुकीची दामधूम जोरदार सुरु आहे. त्यामुळे राजकारणात प्रचंड उलथापालथ होताना दिसत आहे. बिहार निवडणूक नुकतीच...

By: Team Navakal
Election Commission
Social + WhatsApp CTA

Election Commission : संपूर्ण भारतात निवडणुकीची दामधूम जोरदार सुरु आहे. त्यामुळे राजकारणात प्रचंड उलथापालथ होताना दिसत आहे. बिहार निवडणूक नुकतीच पार पडली. बिहार निवडणूकी आधीच राहुल गांधींनी फोडलेला ‘हायड्रोजन बॉम्ब’ चांगलाच चर्चेत होता. मागच्या वर्षी झालेल्या हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मदतीने २५ लाख बोगस मतदारांचा भरणा करुन भाजपने मते चोरली असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला.

या आधी पासून मत चोरीचा दावा सातत्याने होत होता. पण यातून निष्पन्न काहीच झालं नाही. महाराष्ट्रातही मत चोरी विरुद्ध अनेक मोर्चे निघाले बोगस मदतरांची नावे मतदार यादीतून हटवा असे नारे देखील देण्यात आले. पण मतदार यादी तपासणी सोडा त्याआधीच निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केला त्यामुळे राज्यातील वातावरण अधिक गढूळ झाले आहे.

गेले काही काळापासून सातत्याने हे आऱोप्रत्यारोपाचं सत्र सुरूच आहे. पण खरं तस पाहायला गेलं तर त्यातून काय निष्पन्न होणार, हा प्रश्न या हायड्रोजन बॉम्बच्या कथित स्फोटानंतरही कायम राहतोच. आरोप करणारे आणि ज्यांच्यावर आरोप होत आहे असे ते दोघेही त्या दोघांचा हि द्रीष्टीकोन कमालीचा वेगळा आहे. त्यामुळे राष्ट्रातील जनता अधिक संभ्रमित होताना दिसत आहे.

राष्ट्रात राजकारण सोडून इतर प्रश्न खरच नाही आहेत का? सततचे आरोप प्रत्यारोप यामुळे जनतेतील संभ्रम त्यामुळे राष्ट्रातील राजकारण अधिक गढूळ झालेले पाहायला मिळते. राहुल गांधींनच तर आता धोरण आहे. केंद्रातील सत्ताधारी आणि निवडणूक आयोगाविषयी जबरदस्त असा संशयकल्लोळ निर्माण करायचा, ही राहुल गांधींची अलीकडची नवीन रणनीती राहिली आहे, तर राहुल गांधी यांची सतत खिल्ली उडवून त्यांच्यावर वाटेल ते आरोप करून मूळ प्रश्नांना बगल द्यायची, हा भाजपनेत्यांचा कायमच पवित्रा राहिला आहे.

जर राज्यात पर्यायाने देशातील राजकारणाला ब्रेक लागणे अत्यंत गरजेचे आहे. असं म्हणतात आपण तंत्रज्ञानाच्या शिखरावर पोहोचलो आहे. पण खरच तस आहे का? तंत्रज्ञानाच्या विलक्षण प्रगतीनंतर देखील मतदारयाद्यांतील दुबार नावे वगळणे, त्रुटी दूर करणे, गैरप्रकारांना वाव राहणार नाही, याची दक्षता घेणे हे सगळे अगदी सहज शक्य व्हायला हवे होते. त्यावर लक्ष केंद्रित करणे अधिक गरजेचे होते. परंतु दुर्दैवाने हि आरोप प्रत्यारोपाची मालिका आजही सुरूच आहे.

विरोधी पक्ष नेते आरोप करतात आणि बाजूला होतात आणि सत्ताधारी प्रतिउत्तर करून बाजूला होतात त्यामुळे याला सीमाच राहत नाही. राज्यातील देशातील विरोधी पक्षनेते एकवटले तर हा प्रश्न कदाचित कुठे तरी थांबवेल. पण त्यांच्या आपासातील भांडणमुळे मूळ प्रश्न कायमच बाजूलाराहतो . सत्ताधारी पक्ष देखील याला अपवाद नाही आहे.

खर तर व्यवस्तेत सुधार हवा असेल तर सर्व पक्षांना काही बाबतीत एकत्रित कामही करावे लागेल. परंतु असा विधायक दृष्टिकोन जवळजवळ संपुष्टात येताना दिसत आहे. प्रत्येक बाबतीत परस्परांविषयी अविश्वास आणि कुरघोडी यातून राजकारणाला नवीन दिशा मिळण्या ऐवजी हे राजकारण अधिक गढूळ होत चाललं आहे. यामुळे भारतीय लोकशाहीच्या प्रतिमेवर देशातच नव्हे तर देशाबाहेरही शिंतोडे उडत राहतील याची भीती आता उत्भवते आहे.


हे देखील वाचा –

Delhi Blast:कारमध्ये शक्तिशाली स्फोट! दिल्ली हादरली ! 8 जणांचा मृत्यू! मुंबईसह देशभर अलर्ट

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या