Epstein Files Sex Scandal : आपल्या देशातील राजकीय वर्तुळात ‘एपस्टीन फाइल्स’ हे शब्द मागील काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहेत. तास पाहायला गेलं तर याची चर्चा अमेरिकेत मागील कित्येक महिन्यांपासून आहे. अमेरिकेतील लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनशी संबंधित फायलींमध्ये भारताची प्राचीन वैद्यकीय प्रणाली असलेल्या आणि अतिशय पवित्र अश्या आयुर्वेदाचाही उल्लेख आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने जारी केलेल्या या कागदपत्रांमध्ये मालिश तंत्रे आणि आयुर्वेदिक उपचारांचे वर्णन शरीराला विषमुक्त करण्याचे मार्ग म्हणून प्रसारित केले आहे.
जारी केलेल्या कागदपत्रांमध्ये, अशाच एका पत्राचा समावेश असल्याचे म्हटले आहे. पाश्चात्य देशांमधील बरेच लोक आता भारताच्या जवळजवळ ५,००० वर्ष जुन्या निसर्गोपचार प्रणालीवर आधारित मालिश आणि उपचार पद्धतींचा अवलंब करत असल्याच्या चर्चा आहेत. या फाईल्समध्ये “द आर्ट ऑफ गिव्हिंग मसाज” सारख्या लेखांचा उल्लेख आहे, ज्यामध्ये तीळ तेलाच्या मालिशद्वारे शरीराला विषमुक्त करण्याचे फायदे सांगण्यात आले आहेत. त्यात आयुर्वेदाचे वर्णन एक नैसर्गिक आणि पारंपारिक उपचार पद्धत म्हणून देखील करण्यात आले आहेत.
काही कागदपत्रे अशीही आढळली आहेत जी “बाळांच्या मालिश प्रशिक्षणासाठी” सूचनांचे वर्णन करतात याचा सोप्पं अर्थ असा की कागदपत्रांमध्ये काय करावे आणि ते कसे करावे याबद्दल स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये मुलींना ग्राहकाला मालिश करण्याच्या सूचना देखील समाविष्ट आहेत. यामध्ये काही लैंगिकदृष्ट्या स्पष्ट प्रक्रियांचा देखील समावेश करण्यात आला आहे.
एपस्टीन फाइल्समध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या प्रतिमा समोर आल्यामुळे अमेरिकेसोबतच देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. क्लिंटन यांच्या प्रवक्त्याने व्हाईट हाऊसवर त्यांचा जाणूनबुजून “बळीचा बकरा”केला जात आहे. खऱ्या मुद्द्यांपासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देखील त्याने केला आहे.
काँग्रेसच्या आदेशानुसार प्रसिद्ध झालेल्या या फायलींमध्ये क्लिंटन यांचे एपस्टीन आणि त्यांचे सहकारी घिसलेन मॅक्सवेल यांच्यासोबतचे फोटो देखील दाखवले आहेत. एका फोटोमध्ये क्लिंटन मॅक्सवेल आणि एका तरुणीसोबत स्विमिंग पूलमध्ये दिसत आहेत, आणि त्यामुळेच चेहरा झाकलेला आहे. आणि एका फोटोमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन हे स्विमिंग पूलमध्ये दोन महिलांसोबत आंघोळ करताना दिसत आहेत. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, क्लिंटन यांच्या अध्यक्षपदाच्या काळात एपस्टीन यांनी किमान १७ वेळा व्हाईट हाऊसला याआधी भेट दिली होती. शिवाय, पद सोडल्यानंतर, क्लिंटन यांनी त्यांच्या संस्थेशी संबंधित कामासाठी एपस्टीनच्या काही खाजगी विमानांमधून आशिया आणि आफ्रिकेचा प्रवासही केला होता. पण क्लिंटनवर अद्याप एपस्टीनशी संबंधित कोणत्याही गुन्ह्यांचा औपचारिक आरोप लावण्यात आलेला नाही. क्लिंटन यांनी सातत्याने सांगितले आहे की त्यांचा या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा सहभाग नाही.
क्लिंटनचे प्रवक्ते एंजल उरेना यांनी सोशल मीडियावर याबाबत अधिक माहिती दिली आहे ते सांगतात की, व्हाईट हाऊसने या फायली अनेक महिने रोखून ठेवल्या होत्या आणि आता क्लिंटनला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्या आता प्रसिद्ध करत आहेत. ते म्हणाले की, हे स्वतःचे रक्षण करण्यासाठी आणि येणाऱ्या खुलाशांपासून लक्ष विचलित करण्यासाठी त्यांनी हे कृत्य केले आहे.
पुढे त्याचे प्रवक्त्याने असेही म्हटले आहे की क्लिंटनने एपस्टीनचे गुन्हे उघडकीस येण्याच्या खूप आधी २००५ च्या सुमारास त्याच्याशी आम्ही संबंध तोडले होते.
शुक्रवारी रात्री प्रसिद्ध झालेल्या कागदपत्रांमध्ये एपस्टीन आणि त्याची सहकारी घिसलेन मॅक्सवेल यांच्या प्रकरणांशी संबंधित ग्रँड ज्युरी रेकॉर्ड्सचा देखील मोठा समावेश आहे, ज्यामध्ये पीडितांच्या साक्षी आणि प्रवास कागदपत्रांचा यामध्ये समावेश आहे.
यात अनेक नावे गुप्त आहेत. न्याय विभाग भविष्यात एपस्टीन प्रकरणाशी संबंधित अधिक माहिती जाहीर करणार आहेत. यामध्ये एपस्टीनच्या मालमत्तेचे तपशील, आर्थिक व्यवहार, प्रवासाचे रेकॉर्ड आणि महिलांबद्दलच्या नोट्सचा देखील समावेश आहे. मॅक्सवेलशी संबंधित स्लाईड्समध्ये एपस्टाईनसोबतचे तिचे फोटो आणि फ्लाइट माहिती देखील समाविष्ट करण्यात आली आहे.
या कागदपत्रांमध्ये एका एफबीआय एजंटची साक्ष देखील उघडकीस आली आहे. एजंटने सांगितले की, शाळा सोडल्यानंतर एका १४ वर्षांच्या मुलीची एपस्टीनशी ओळख झाली होती. तिला सांगण्यात आले की जर तिने एका श्रीमंत माणसाला मसाज दिला तर तिला पैसे मिळतील आणि त्यानंतर या विकृत वृत्तीच्या माणसांनी तिचे लैंगिक शोषण केले.
एजंटच्या म्हणण्यानुसार, इतर मुलींनाही अशाच प्रकारे अमिश दाखवून आणण्यात आले होते आणि एका मुलीने एपस्टीनसाठी जवजवळ २० ते ५० मुली जमवल्या.
काही वृत्तांच्या म्हणण्यानुसार, एपस्टीनशी संबंधित नवीन फायलींमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचाही उल्लेख करण्यात आला आहे त्यामुळे अमेरिकेच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. मागील न्यायालयीन कागदपत्रांमधून असे दिसून आले आहे की एपस्टीनने १९९० च्या दशकात फ्लोरिडामधील त्यांच्या मार-ए-लागो रिसॉर्टमध्ये ट्रम्पसाठी १४ वर्षांच्या मुलीसोबत भेटीची व्यवस्था देखील केली होती. कागदपत्रांमध्ये असे म्हटले आहे की त्यावेळी विकृत एपस्टीनने ट्रम्पला विनोदाने म्हटले होते, “छान आहे ना?” ट्रम्प हसले आणि त्यावर मान हलवली. कागदपत्रांनुसार, ते दोघेही हसले, तर मुलीला ते विचित्र आणि अस्वस्थ वाटले.
हे आरोप २०२० मध्ये एपस्टीनच्या इस्टेट आणि त्याच्या सहकाऱ्या घिसलेन मॅक्सवेलविरुद्ध दाखल केलेल्या खटल्या दरम्यान समोर आले होते. पीडित महिलेचा आरोप आहे की वासनेने भरलेल्या एपस्टीनने अनेक वर्षांपासून तिचे आमिष दाखवले आणि तिचे लैंगिक शोषण केले. तथापि, तिने या प्रकरणात अद्याप ट्रम्पवर थेट आरोप केलेले नाहीत.









