फास्टॅग वार्षिक पास काय आहे? किंमतीपासून खरेदीपर्यंत… जाणून घ्या सर्व माहिती

FASTag Annual Pass Details in Marathi

FASTag Annual Pass Details in Marathi: सरकारकडून राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास अधिक जलद व कमी खर्चिक व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे सरकारकडून काही दिवसांपूर्वीच वार्षिक फास्टॅग पासची (FASTag Annual Pass) घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे आता एकदा फास्टॅग पास काढल्यावर वर्षभर पुन्हा अतिरिक्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत.

15 ऑगस्ट 2025 पासून फास्टॅग वार्षिक पास उपलब्ध होणार आहे. या नवीन वार्षिक पासमुळे राष्ट्रीय महामार्ग (NH) आणि राष्ट्रीय द्रुतगती महामार्ग (NE) वरील प्रवासाचा अनुभव अधिक सोपा आणि खर्चिक होणार आहे. फास्टॅग वार्षिक पासबद्दल (FASTag Annual Pass Details in Marathi) तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे

फास्टॅग वार्षिक पास (FASTag Annual Pass) म्हणजे काय?

15 ऑगस्ट 2025 पासून हा फास्टॅग वार्षिक पास सुरू होईल. या पासमुळे खाजगी कार, जीप आणि व्हॅनसारख्या वाहनांना एका वर्षासाठी किंवा 200 ट्रीप्स (जे आधी होईल) साठी टोल प्लाझातून मोफत प्रवास करता येणार आहे.

पासची किंमत किती?

2025-26 या वर्षासाठी या फास्टॅग वार्षिक पासची किंमत 3,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे. ‘राजमार्गयात्रा’ या मोबाईल ॲप्लिकेशन किंवा ‘एनएचएआय’च्या (NHAI) वेबसाइटद्वारे हे पैसे भरता येतील.

पास कसा सुरू करायचा?

वाहनाची पात्रता आणि त्याच्याशी जोडलेल्या फास्टॅगची पडताळणी झाल्यानंतरच हा वार्षिक पास सुरू केला जाईल. 3,000 रुपयांचे पेमेंट यशस्वी झाल्यानंतर, नोंदणीकृत फास्टॅगवर दोन तासांच्या आत हा पास सुरू होईल.

पासची वैधता किती?

या वार्षिक पासची वैधता सक्रिय केल्याच्या तारखेपासून एक वर्ष किंवा 200 ट्रीप्स (जे आधी होईल) इतकी आहे. एकदा 200 ट्रीप्स पूर्ण झाल्या किंवा एक वर्ष पूर्ण झाले, की हा पास आपोआप नियमित फास्टॅगमध्ये रूपांतरित होईल.

एका ट्रीपचा अर्थ काय?

पॉइंट-आधारित टोल प्लाझासाठी, प्रत्येक वेळेस टोल पार करणे म्हणजे एक ट्रीप मानली जाईल. ‘राउंड ट्रीप’ (येणे-जाणे) म्हणजे दोन ट्रीप्स. बंद टोल प्लाझासाठी, एकदा प्रवेश करून बाहेर पडणे म्हणजे एक ट्रीप मानली जाईल.

पास दुसऱ्या वाहनावर वापरता येतो का?

नाही. हा पास दुसऱ्या वाहनावर हस्तांतरित करता येणार नाही. तो फक्त त्याच वाहनासाठी वैध असेल, ज्यावर फास्टॅग लावलेला आहे आणि नोंदणीकृत आहे. दुसऱ्या वाहनावर वापरल्यास तो निष्क्रिय होईल.