Former ED Officer Kapil Raj joined Reliance Industries: भारतीय महसूल सेवेचे (IRS) 2009 च्या बॅचचे अधिकारी आणि अंमलबजावणी संचालनालयाचे (ED) माजी सहसंचालक कपिल राज (Kapil Raj) यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) मध्ये सहभागी झाले आहेत. (Former ED Officer Kapil Raj joined Reliance Industries)
सरकारी सेवेत असताना त्यांची कारकीर्द चांगलीच चर्चेत राहिली. अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास त्यांनी केला. यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मद्य धोरण प्रकरणात आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या जमीन घोटाळा प्रकरणात त्यांनी तपास अधिकारी म्हणून काम केले होते.
16 वर्षांच्या सरकारी सेवेनंतर काही दिवसांपूर्वीच वैयक्तिक कारणांमुळे स्वेच्छानिवृत्ती घेतली. आता ते रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) मध्ये16 वर्षांच्या सरकारी सेवेनंतर काही दिवसांपूर्वीच वैयक्तिक कारणांमुळे स्वेच्छानिवृत्ती घेतली. आता ते सहभागी झाले आहेत. याबाबत फायनान्शिअल एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.
अनेक मोठ्या प्रकरणांचा तपास
ईडीमधील 8 वर्षांच्या कार्यकाळात कपिल राज यांनी अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास केला. यामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या मद्य धोरण प्रकरणात आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या जमीन घोटाळा प्रकरणात त्यांनी तपास अधिकारी म्हणून काम केले होते.
याआधी मुंबईत उपसंचालक असताना त्यांनी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्याशी संबंधित आर्थिक घोटाळे, तसेच डीएचएफएल आणि इक्बाल मिर्ची प्रकरणांमध्येही तपास केला होता.
लखनऊमधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगची पदवी घेतलेले कपिल राज त्यांच्या कामातील कठोर शिस्तीसाठी ओळखले जातात. ते अनेकदा स्वतः चौकशीची प्रश्नावली तयार करायचे आणि आपल्या टीमला प्रोत्साहन देण्यासाठी धाडींमध्येही सहभागी व्हायचे. आता कपिल राज यांच्या रिललायन्समधील प्रवेशामुळे कॉर्पोरेट जगतात नोकरशहांचा वाढता कल दिसून येत आहे.