Home / देश-विदेश / Babri mosque: पश्चिम बंगालमध्ये नव्या बाबरीची पायाभरणी

Babri mosque: पश्चिम बंगालमध्ये नव्या बाबरीची पायाभरणी

Babri mosque: पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा बाबरी मशिदीच्या(Babri mosque) पायाभरणी समारंभाची घोषणा करणारे पोस्टर्स लावण्यात आले. बाबरी...

By: Team Navakal
Babri mosque
Social + WhatsApp CTA

Babri mosque: पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा बाबरी मशिदीच्या(Babri mosque) पायाभरणी समारंभाची घोषणा करणारे पोस्टर्स लावण्यात आले. बाबरी मशिदीचा पायाभरणी समारंभ ६ डिसेंबर रोजी बेलडांगा येथे होईल,असे या पोस्टरवर म्हटले आहे.

तृणमूल काँग्रेसचे (Trinamool Congress) आमदार हुमायून कबीर (Humayun Kabir) यांना पायाभरणी समारंभाचे आयोजक म्हणून घोषित केले आहे. कबीर यांनी सांगितले की ते ६ डिसेंबर रोजी बाबरी मशिदीची पायाभरणी करतील.त्याचे बांधकाम तीन वर्षांत पूर्ण होईल. या कार्यक्रमाला अनेक मुस्लिम नेते उपस्थित राहतील.

काँग्रेसने तृणमूल काँग्रेसच्या कबीर यांना पाठिंबा दिला. काँग्रेस नेते उदित राज म्हणाले, “जर मंदिराची पायाभरणी होऊ शकते तर मशिदीची का नाही? अनावश्यक वाद निर्माण केला जात आहे. सर्वांना धार्मिक स्वातंत्र्य आहे. काँग्रेस नेते हुसेन दलवाई म्हणाले,मशीद बांधणे ठीक आहे, पण बाबरी मशीद का? राजकीय फायद्यासाठी आधीच सोडवलेला वाद पुन्हा का सुरू करायचा?

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या