Home / देश-विदेश / Gadget-News: तुमच्या बजेटमध्ये घ्या बेस्ट टॅब; आता २०,००० रुपये बजेटमध्ये पावरफुल टॅब

Gadget-News: तुमच्या बजेटमध्ये घ्या बेस्ट टॅब; आता २०,००० रुपये बजेटमध्ये पावरफुल टॅब

Gadget-News: बजेटनुसार प्रत्यक गोष्टी व्हाव्यात अशी प्रत्येकाची इच्छा असते. आणि त्यात विविध प्रकारचे गॅजेटवर (Gadget)सुद्धा आपलं तितकंच प्रेम असत. आपल्या...

By: Team Navakal
Gadget-News

Gadget-News: बजेटनुसार प्रत्यक गोष्टी व्हाव्यात अशी प्रत्येकाची इच्छा असते. आणि त्यात विविध प्रकारचे गॅजेटवर (Gadget)सुद्धा आपलं तितकंच प्रेम असत. आपल्या बजेटमध्ये पण छान चालणार टॅब घेणं म्हणजे स्वप्नच अस देखील वाटत. पण थांबा तुमचा हा विचार बाजूला ठेवा कारण या विचारांना अपवाद असणारे काही टॅब (TAB)आता मार्केटमध्ये उपलबध आहेत. या टॅबमध्ये प्रामुख्याने ३ प्रकारचे टॅब (TAB) पाहायला मिळतील. २०,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारे काही ब्रँडेड टॅब आहेत याची सविस्तर माहिती जाणून घ्या.

लॅपटॉपचं प्रतिबिंब म्हणून देखील हा मिनी लॅपटॉप अर्थात टॅब हा ओळखला जातो. ह्यात अनेक ब्रँडेड टॅबचासुद्धा समावेश आहे. यात सुरवातीला वनप्लस पॅड गो (One Plus Pad Go) या नावाचा टॅब आहे. जो आमझोन सारख्या खरेदीच्या वेबसाईटवर तुम्हाला सहज मिळेल. ह्या टॅबची किंमत १८,९९९ इतकी आहे.
यावर तुम्हाला सवलत देखील मिळणार आहे त्यासाठी तुमच्याकडे योगय ते बँक कार्ड हव. ह्या टॅब बद्दल अधिक सांगायचं झालं तर या टॅबची उंची ११:३५ इंच इतकी आहे. याशिवाय टॅब मीडियाटेकची हीलियो G99 प्रोसेसरने सुसज्ज आहे. याशिवाय या टॅबमध्ये 8000mAh इतकी बॅटरी मिळते. याचबरोबर 33W फास्ट चार्जिंग देखील उपलब्ध आहे. या टॅबमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 4G LTE (कॉलिंग) आहे. यासह सपोर्टसह वायफाय आहे. ऑडिओसाठी, यात डॉल्बी एटमॉस क्वाड स्पीकर देखील असेल.

यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. सॅमसंग गॅलॅकसी टॅब A9+ (Samsung Galaxy Tab A9+) हा आहे. हा टॅब ऍमेझॉनवरती १७,२४९ इतक्या किमतीती खरेदी करता येणार आहे. या टॅबची स्क्रीन ११:०० इंच इतकी आहे. याशिवाय टॅब क्वालकॉम स्नॅपड्रॅगन एसएम ६३७५ प्रोसेसरसह सुसज्ज आहे. कंपनीने यात 7040mAh ची देखील बॅटरी दिली आहे.

या यादीतला शेवटचा टॅब म्हणजे रेडमी पॅड प्रो (Redmi Pad Pro) या टॅबची किंमत १८,९९९ इतकी आहे. या टॅबवर बँक कार्डद्वारे ३००० रुपयांची सवलत देखील आहे. या टॅबची स्क्रीन १२.०१ इंच इतकी आहे. शिवाय, टॅब स्नॅपड्रॅगन 7s जेन २ प्रोसेसरसह तयार आहे. टॅबमध्ये १०,००० 0mAh ची बॅटरी देखील मिळणार आहे. यामध्ये आवाजासाठी कॉड्स देखील आहेत.


हे देखील वाचा

‘या’ देशात बुरखा आणि नकाबवर संपूर्ण बंदी येणार! ‘इस्लामिक फुटीरतावाद’ थांबवण्यासाठी नवा कायदा

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या