Genocide unfolding in Sudan : मागच्या काही काळापासून जगभरात अनेक देशांमधील युद्ध विकोपाला गेलेली दिसली त्यामुळे अनेक जीवितहानी वित्तहानी झालेली पाहायला मिळाली. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेले सुदानमधील गृहयुद्ध देखील याला अपवाद नाही. पण आता हे युद्ध भलतेच चिघळले आहे. सुदानी सैन्याचे दोन गट देशावर नियंत्रण मिळवण्यासाठी एकमेकांशी अतितटीची लढाई लढत आहेत. एका बाजूला सुदानी सैन्य आहे आणि दुसऱ्या बाजूला रॅपिड सपोर्ट फोर्सेस (आरएसएफ) आहेत. सुदानी सैन्याने म्हटले आहे की आरएसएफने मागच्या ४८ तासांत २००० हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. परिस्थिती भीषण होत चालली आहे. उपग्रह प्रतिमांमध्येही मृतदेहांचे ढीगच्या ढीग दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे सुदानमध्ये हत्याकांड(Genocide) होत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
येलच्या मानवतावादी संशोधन प्रयोगशाळेने (एचआरएल) पाहिलेल्या उपग्रह प्रतिमांच्या विश्लेषणातून देशातील परिस्थिती हि अत्यंत भीषण असल्याचे सांगण्यात आले आहे. काही अहवालानुसार रॅपिड सपोर्ट फोर्सेस (आरएसएफ) या गटाने एल-फाशर शहरात महिला आणि मुलांसह २००० हून अधिक सुदानच्या नागरिकांना ठार मारले असल्याचे सांगतिले. एचआरएलने म्हटले आहे की, सॅटेलाईट प्रतिमांमध्ये जमीन लाल रंगाची झाल्याचे दिसत असून २०२३ पासून सुदानमध्ये गृहयुद्ध हे जोरदार सुरू आहे, जे जगातील मानवनिर्मित असे सर्वात मोठे संकट मानले जाते.
या युद्धात सुदानचे सशस्त्र दल (एसएएफ) आणि आरएसएफ यांच्यात जोरदार संघर्ष सुरू आहे. आरएसएफ हे अर्धसैनिक दल असून या गटावर अनेक वर्षांपासून मोठ्या हत्याकांडांचा आणि लैंगिक हिंसाचाराचा आरोप सातत्याने होत आहे. रविवारी आरएसएफने एसएएफचा तळ ताब्यात घेतल्याचे सांगत एका शहरावर नियंत्रण मिळवले असल्याचे जाहीर केले आहे. दुसरीकडे, एसएएफने आपले सैन्य सुरक्षित ठिकाणी हलवल्याचे आणि शहरातून माघार घेतल्याचे देखील मान्य केले आहे.
आरएसएफ हा दारफूर येथील एक मोठा शक्तिशाली अर्धसैनिक दल आहे. या दलाचा प्रमुख, जनरल मोहम्मद हमदान दगालो याला ‘हेमेदती’ किंवा ‘छोटा मोहम्मद’ या नावाने देखील ओळखले जातो. त्याने सुदानमध्ये एका समांतर सरकारचा प्रमुख म्हणून शपथ घेतली असल्याची माहिती आहे. या मिलिशियामध्ये अरब आणि अरबी भाषिक नागरिकांचा देखील समावेश होता. तत्कालीन अध्यक्ष ओमर अल-बशीर यांच्या नेतृत्वाखालील सरकारने या मिलिशियाला मदत केली आणि त्यांना शस्त्रेसुद्धा पुरवली.
या संघर्षादरम्यान नागरिकांची हत्या करणे तसेच त्याची घरे जाळणे यांसारखे मोठे अत्याचार केल्याचा गंभीर आरोप या मिलिशिया आणि त्यांच्या कमांडरांवर ठेवण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने मिलिशियाचे नेते आणि सरकारी अधिकाऱ्यांवरही दारफूरमध्ये नरसंहार , युद्ध गुन्हे आणि मानवतेविरुद्ध गुन्हे केल्याचे आरोप याआधी लावले होते. दहा वर्षांनंतर, २०१३ मध्ये सरकारमार्फत आरएसएफची स्थापना करण्यात आली.
आरएसएफवर दारफूर, दक्षिण कोर्दोफान आणि ब्लू नाईल या ठिकाणी मोठा अत्याचार केल्याचा आरोप आहे.आरएसएफ आता अधिकृतपणे सरकारी गट आहे. २०१७ मध्ये सरकारने त्यांना स्वतंत्र अर्धसैनिक दल म्हणून घोषित केले. यामुळे ते तत्कालीन अध्यक्ष अल-बशीर यांच्या थेट नियंत्रणाखाली आले. सुदानचे अध्यक्ष या दलाचा वापर त्यांच्या ‘प्रेटोरियन गार्ड’ म्हणून करू लागले.
अनेक महिन्यांच्या मोठ्या आंदोलनानंतर २०१९ मध्ये सैन्याने अल-बशीर यांच्याविरोधात बंड केले तेव्हा आरएसएफने सुदानच्या अध्यक्षांना सत्तेतून दूर करण्याचा प्रयत्न देखील केला गेला. एसएएफ आणि आरएसएफ यांनी सुरुवातीला सुदानवर राज्य करण्यासाठी लोकशाहीवादी शक्तींशी सत्ता-वाटप करार देखील केला होता आणि अर्थशास्त्रज्ञ अब्दल्ला हमदोक यांनी पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला होता . दरम्यान, हेमेदती लष्करी परिषदेचा उपप्रमुख झाला आणि नंतर एसएएफ आणि आरएसएफ दोन्ही कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या सार्वभौम परिषदेचा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले.
यामागील प्रमुख उद्धिष्ट सुदानला लोकशाहीच्या मार्गावर आणणे हा होता. २०२१ मध्ये, हेमेदती आणि एसएएफचे प्रमुख जनरल अब्देल फत्ताह अल-बुरहान यांनी दुसरे बंड केले आणि तत्कालीन पंतप्रधान हमदोक यांना पदच्युत करण्यात आले. या बंडामुळे सुदानमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली आणि देशात लोकशाही आणण्याचे सर्व प्रयत्न तिथेच थांबले.
नवीन सार्वभौम परिषद स्थापन झाली आणि हेमेदतीने आपले स्थान कायम ठेवले. मात्र, आरएसएफला सुदानच्या सशस्त्र दलात (एसएएफ) समाविष्ट करण्याच्या योजनेवरून आणि या सैन्याचे नेतृत्व कोण करेल यावरून हेमेदती आणि अल-बुरहान यांच्यात वाद निर्माण झाला. एसएएफ आणि लोकशाहीवादी शक्तींची ही दीर्घकाळची मागणी होती, मात्र याला आरएसएफचा स्पष्ट विरोध होता. आरएसएफला वाटत होते की, त्याचा कमांडर हा सरकारचा प्रमुख असावा.
मिडल ईस्ट कौन्सिलचे फेलो आदेल अब्देल गफार यांनी ‘अल जझीरा’ला स्पष्ट केले की, आरएसएफने सैन्यात समाविष्ट होण्यास विरोध केला होता, कारण त्यांना माहित आहे की ते आपली शक्ती गमावतील.” अनेक महिन्यांच्या तणावानंतर, एप्रिल २०२३ मध्ये आरएसएफ आणि एसएएफ मध्ये जोरदार संघर्ष सुरू झाला, दोन्ही बाजूंनी एकमेकांवर संघर्ष सुरू केल्याचा आरोप सातत्याने होत होता. २०१९ पासून दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध शर्थीचा लढत आहेत, ज्यात लाखो लोकांना आपले जीवन गमवावे लागले. आणि लाखो विस्थापित झाले आहेत.
एकेकाळी सुमारे १५ लाख लोकसंख्या असलेल्या या शहरात झपाट्याने माणसे कमी झाली . म्हणजे जेव्हा आरएसएफने ताबा मिळवला तेव्हा सुमारे २,५०,००० इतकी लोकसंख्या होती. या आठवड्याच्या सुरुवातीला सुमारे २६,००० इतके लोक शहरातून पळून गेले. मात्र, अनेक जण या युद्धात अडकले आणि त्यांना अन्न किंवा कोणतीही वैद्यकीय मदत मिळत नाही आहे. निरस्त्र नागरिकांना अगदी जवळून गोळ्या घालून ठार मारल्याच्या व्हिडिओ तसेच जमिनीवर पडलेल्या मृतदेहांचे रक्तबंबाळ असलेले मृतदेह या सगळ्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. एसएएफचा मित्रपक्ष असलेल्या जॉइंट फोर्सेसने आरएसएफने एल-फाशर ताब्यात घेतल्यापासून २००० हून अधिक निरस्त्र नागरिकांना मारल्याचा आरोप सातत्याने केला आहे.
दरम्यान, सुदान डॉक्टर्स नेटवर्कने सांगितले की आरएसएफने सहा डॉक्टरांचे अपहरण देखील केले आहे आणि त्यांना सोडवण्यासाठी सुमारे १ दशलक्ष डॉलर्सची मागणी केली आहे. रुग्णालये ताब्यात घेणे, अटक करणे आणि रुग्णालयांवर हल्ले झाल्याचे वृत्त देखील समोर आहेत. आरएसएफचे जवान जखमी रुग्णांनाही ठार मारत असल्याचे गंभीर आरोप देखील केले आहेत.
संयुक्त राष्ट्र मानवाधिकार कार्यालयाने म्हटले आहे की, “पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागरिकांना तात्काळ ठार मारल्याचे अहवाल आहेत. तसेच, मोठ्या संख्येने निरस्त्र पुरुषांना गोळ्या घालण्याचे विकृत प्रकार चालू आहेत. आरएसएफने महिला आणि मुलांसह नागरिकांविरुद्ध केलेल्या भयंकर दहशतवादी गुन्ह्यांवर सुदानी परराष्ट्र मंत्रालयाने सडकून टीका केली आहे. ह्या विकृत मानसिकतेची आजही आपलं जग वाईट पद्धतीने झुंजताना दिसत आहे. ह्यामुळे जगाचा ऱ्हास व्हायला वेळ लागणार नाही.
हे देखील वाचा – महिन्याला भरा फक्त 6,522 आणि घरी आणा Tata Tiago; जाणून घ्या फायनान्स प्लॅन









