Home / देश-विदेश / Korean Love Game Warning: 3 सख्ख्या बहिणींच्या आत्महत्येसाठी कारणीभूत ठरलेले ‘कोरियन लव्ह गेम’ काय आहे?

Korean Love Game Warning: 3 सख्ख्या बहिणींच्या आत्महत्येसाठी कारणीभूत ठरलेले ‘कोरियन लव्ह गेम’ काय आहे?

Korean Love Game Warning: ऑनलाइन गेमिंगच्या जगात पुन्हा एकदा एक भयंकर आणि जीवघेणा प्रकार समोर आला आहे. गाझियाबादमधील तीन सख्ख्या...

By: Team Navakal
Korean Love Game Warning
Social + WhatsApp CTA

Korean Love Game Warning: ऑनलाइन गेमिंगच्या जगात पुन्हा एकदा एक भयंकर आणि जीवघेणा प्रकार समोर आला आहे. गाझियाबादमधील तीन सख्ख्या बहिणींनी एका टास्कर आधारित ‘कोरियन लव्ह गेम’च्या नादापाई आपले आयुष्य संपवले आहे.

१६, १४ आणि १२ वर्षांच्या या तीन मुली गेल्या दोन वर्षांपासून ‘वी आर नॉट इंडियन्स’ नावाच्या एका अनाकलनीय ऑनलाइन खेळाच्या आहारी गेल्या होत्या. या तिघींनी आपल्या इमारतीच्या ९ व्या मजल्यावरून उडी मारली.

काय आहे हा ‘कोरियन लव्ह गेम’?

तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, हा खेळ सोशल मीडिया किंवा विशिष्ट मोबाइल ॲप्सद्वारे सुरू होतो. एखादी अनोळखी व्यक्ती स्वतःला कोरियन नागरिक असल्याचे सांगून मुलांशी मैत्री करते. हळूहळू विश्‍वास संपादन केल्यानंतर, ही व्यक्ती मुलांना ५० दिवसांचे चॅलेंज देते.

सुरुवातीला मध्यरात्री उठणे यांसारखी साधी कामे दिली जातात, परंतु हळूहळू ही आव्हाने कठीण आणि हिंसक होत जातात. या खेळाचा ५० वा दिवस हा ‘आत्महत्या’ करण्याचे शेवटचे चॅलेंज असतो.

बहिण‍ींच्या वागण्यात झाले होते बदल

या तिन्ही बहिणींच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुली स्वतःला कोरियन नावांनी ओळखू लागल्या होत्या. जेव्हा पालकांनी त्यांना मोबाइलपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी “कोरिया हेच आमचे आयुष्य आणि आमचे पहिले प्रेम आहे, आम्ही ते सोडू शकत नाही,” असे उत्तर दिले होते.

या मुलींनी दोन वर्षांपासून शाळेत जाणेही बंद केले होते. त्यांच्या खोलीतील भिंतीवर “मी खूप एकटी आहे” आणि “माझे हृदय तुटले आहे” असे अस्वस्थ करणारे संदेश लिहिलेले आढळले आहेत.

‘ब्लू व्हेल’ आणि ‘मोमो’ चॅलेंजची आठवण

या घटनेने २०१७ मध्ये गाजलेल्या ‘ब्लू व्हेल’ आणि २०१८ मधील ‘मोमो’ चॅलेंजच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. या खेळांमध्येही मुलांना मानसिकरीत्या कमकुवत करून त्यांना स्वतःला इजा करून घेण्यास प्रवृत्त केले जात असे. गाझियाबादमधील या मुलींच्या आत्महत्येव्यतिरिक्त मध्य प्रदेशातील इंदूरमध्येही एका १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू याच खेळाशी संबंधित असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सायबर तज्ज्ञ आणि पोलिसांनी पालकांना आपल्या मुलांच्या इंटरनेट वापराकडे आणि त्यांच्या वागणुकीतील बदलांकडे बारकाईने लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. मुले जर अचानक एकलकोंडी झाली असतील किंवा रात्री उशिरापर्यंत मोबाइलवर व्यस्त असतील, तर वेळीच सावध होणे गरजेचे आहे.

Web Title:
संबंधित बातम्या