Home / देश-विदेश / Gold and Silver Rate : जागतिक महायुद्धाचे ढग ओसरले: अमेरिका-इराणमध्ये दोन आठवड्यांची शस्त्रसंधी; भारतीय शेअर बाजारात ऐतिहासिक उसळी, तर सोन्याचे दर दीड लाखा

Gold and Silver Rate : जागतिक महायुद्धाचे ढग ओसरले: अमेरिका-इराणमध्ये दोन आठवड्यांची शस्त्रसंधी; भारतीय शेअर बाजारात ऐतिहासिक उसळी, तर सोन्याचे दर दीड लाखा

Gold and Silver Rate : गेल्या काही दिवसांपासून जगाला विनाशाच्या उंबरठ्यावर उभ्या करणाऱ्या अमेरिका आणि इराणमधील तणावात अखेर मोठी आणि...

By: Team Navakal
Gold and Silver Rate
Social + WhatsApp CTA

Gold and Silver Rate : गेल्या काही दिवसांपासून जगाला विनाशाच्या उंबरठ्यावर उभ्या करणाऱ्या अमेरिका आणि इराणमधील तणावात अखेर मोठी आणि सकारात्मक शिथिलता आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील दोन आठवड्यांसाठी इराणवर कोणतेही लष्करी हल्ले न करण्याची घोषणा करत तात्पुरती ‘शस्त्रसंधी’ जाहीर केली आहे. इराणने सादर केलेल्या १० कलमी शांतता तहाच्या प्रस्तावावर ट्रम्प यांनी सकारात्मक संकेत दिल्याने युद्धाचे सावट तूर्तास टळले आहे. या निर्णयाचे पडसाद जागतिक बाजारपेठेवर उमटले असून, धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

शेअर बाजारात ‘दिवाळी’: सेन्सेक्सची २७०० अंकांची ऐतिहासिक झेप-
मंगळवारी रात्रीपर्यंत इराणवर अण्वस्त्रांचा प्रयोग होण्याची किंवा तिथली संस्कृती नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात होती, ज्यामुळे जागतिक बाजारपेठेत मोठी पडझड होण्याची शक्यता होती. मात्र, शस्त्रसंधीच्या वृत्ताने बुधवारी सकाळी भारतीय शेअर बाजारात उत्साहाचे उधाण आले. बाजार उघडताच ‘प्री-ओपनिंग’ सत्रात सेन्सेक्सने तब्बल २,७०० अंकांची ऐतिहासिक झेप घेतली, तर निफ्टीमध्ये ७५० अंकांची वाढ नोंदवण्यात आली. विशेषतः आयटी, मेटल आणि रिअॅल्टी क्षेत्रातील समभागांनी मोठी तेजी दर्शवली. अदानी पोर्ट आणि इंडिगो यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी खरेदी पाहायला मिळाली.

कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण-
युद्ध थांबल्याच्या खुणामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय घट झाली आहे. तेलाचे दर १३ टक्क्यांनी कोसळून ९५ डॉलर प्रति बॅरलवर आले आहेत. इंधनाच्या दरात झालेली ही घसरण भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत दिलासादायक मानली जात आहे, कारण यामुळे आयात खर्च कमी होऊन महागाईवर नियंत्रण मिळवणे सोपे होणार आहे.

सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी तेजी: सोने १.५१ लाखांवर-
युद्धाची दाहकता कमी झाली असली, तरी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्या-चांदीकडे पाहणाऱ्यांचा ओघ वाढल्याने मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. स्थानिक बाजारपेठेत जीएसटीव्यतिरिक्त सोन्याच्या भावात एका दिवसात ३,००० रुपयांची वाढ होऊन तो १,५१,५०० रुपये प्रति तोळा या विक्रमी स्तरावर पोहोचला आहे. चांदीच्या दरातही प्रति किलो १०,००० रुपयांची मोठी वाढ झाली असून, चांदी आता २,४७,००० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. आगामी काळात सोन्याचे भाव अधिक वधारण्याची शक्यता सुवर्ण व्यावसायिकांकडून वर्तवण्यात येत आहे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या