Google Meta ED notice | ऑनलाइन बेटिंग प्रकरणाच्या तपासात सक्तवसुली संचालनालयाने (ED) मोठी कारवाई करत तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या Google आणि Meta यांना चौकशीसाठी नोटीस (Google Meta ED notice) बजावली आहे.
या दोन्ही कंपन्यांना 21 जुलै रोजी चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आले असून, या कारवाईमुळे संपूर्ण तपास अधिक व्यापक होण्याची शक्यता आहे.
गुगल आणि मेटावर ‘बेकायदेशीर जाहिरात प्रचार’ प्रकरणी गंभीर आरोप
ED नुसार, गुगल आणि मेटाने बेकायदेशीर बेटिंग ॲप्सना जाहिरात देण्यासाठी मोठ्या प्रमाणात जाहिरात स्लॉट उपलब्ध करून दिले आणि त्यांच्या प्लॅटफॉर्मवर त्या वेबसाइट्सना दृश्यमानतेसाठी प्रोत्साहन दिले. या प्लॅटफॉर्म्सचा वापर आर्थिक फसवणूक, मनी लाँड्रिंग आणि हवाला व्यवहारांसाठी केला जात असल्याचा संशय असून, त्यांचा आर्थिक गुन्ह्यांमधील सहभाग तपासला जात आहे.
महादेव ॲप, फेअरप्ले बेटिंग प्रकरणात बॉलिवूड सेलिब्रिटींची चौकशी
या प्रकरणात महादेव बेटिंग ॲप हे सर्वात मोठे आर्थिक घोटाळे ठरले आहे. या घोटाळ्याचा अंदाज 6,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. या प्रकरणात छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना 500 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळाल्याचा ईडीचा गंभीर आरोप आहे.
गेल्या आठवड्यात, ED ने 29 लोकांविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्यात प्रकाश राज, राणा दग्गुबाती, विजय देवरकोंडा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. त्यांच्यावर बेकायदेशीर बेटिंग ॲप्सना प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे. या सेलिब्रिटींना ॲप प्रमोशनसाठी भरघोस रक्कम दिल्याचा दावा ED ने केला आहे.
फेअरप्ले ॲपने IPL स्ट्रीमिंगचे हक्क मोडले, Viacom18 ला नुकसान
दुसऱ्या प्रकरणात ‘फेअरप्ले आयपीएल बेटिंग ॲप’ने अधिकृत परवानगीशिवाय IPL सामने स्ट्रीम करून Viacom18 या अधिकृत ब्रॉडकास्टरचे मोठे महसूल नुकसान केले. या ॲपने भारतातील अनेक सेलिब्रिटींचा वापर करून स्वतःच्या ग्राहकांची संख्या वाढवली
या संपूर्ण प्रकरणामुळे ईडीकडून मोठ्या प्रमाणावर अटकसत्र राबवले जात असून, शेकडो कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे आणि अनेक आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहेत.
हे देखील वाचा –
मेटाकडून भाषांतरात मोठी चूक, थेट मुख्यमंत्र्यांनाच मृत घोषित केले; आता मागितली माफी