Aircraft Manufacturing in India: भारत आणि रशियाने आपल्या वाढत्या धोरणात्मक संबंधांना अधिक बळकट करत, शॉर्ट-हॉल उड्डाणांसाठी ट्विन इंजिनचे प्रवासी विमान तयार करण्यासाठी संयुक्त सहकार्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
सरकारी मालकीच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या एरोस्पेस कंपनीने रशियाच्या पब्लिक जॉइंट स्टॉक कंपनी युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन सोबत SJ-100 विमानाचे उत्पादन करण्यासाठी करार केला आहे. या करारावर सोमवारी मॉस्को येथे स्वाक्षरी करण्यात आली. भारतात प्रवासी विमान तयार करण्याचा हा पहिलाच प्रकल्प असेल.
‘उडान’ योजनेअंतर्गत प्रादेशिक हवाई कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने, हे ‘SJ-100’ विमान गेम चेंजर ठरू शकते, असे HAL ने म्हटले आहे. या करारानुसार, HAL ला देशांतर्गत ग्राहकांसाठी SJ-100 विमानाचे उत्पादन करण्याचे हक्क मिळतील.
सध्या 200 हून अधिक SJ-100 विमाने तयार झाली असून, 16 पेक्षा जास्त व्यावसायिक एअरलाइन ऑपरेटर्सकडून ती वापरली जात आहेत. HAL आणि UAC यांच्यातील हा सहयोग भारतीय विमान उद्योगाच्या इतिहासातील एक नवीन अध्याय सुरू करेल. नागरी उड्डाण क्षेत्रात ‘आत्मनिर्भर भारत’ चे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
HAL and Public Joint Stock Company United Aircraft Corporation (PJSC-UAC) Russia signed an MoU for production of civil commuter aircraft SJ-100 in Moscow, Russia on October 27, 2025. Shri Prabhat Ranjan, HAL & Mr. Oleg Bogomolov, PJSC UAC, Russia, signed the MoU in the presence… pic.twitter.com/McN8WQjeSl
— HAL (@HALHQBLR) October 28, 2025
HAL ने सांगितले की, या निर्मितीमुळे खाजगी क्षेत्राला बळकटी मिळेल आणि विमान उद्योगात प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
HAL च्या अंदाजानुसार, पुढील 10 वर्षांत प्रादेशिक कनेक्टिव्हिटीसाठी भारतीय विमान क्षेत्राला या श्रेणीतील 200 हून अधिक विमानांची आवश्यकता असेल, तर हिंद महासागर क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळांसाठी अतिरिक्त 350 विमानांची गरज भासेल.
यापूर्वी 1961 मध्ये HAL ने AVRO HS-748 विमानाचे उत्पादन सुरू केले होते, जे 1988 मध्ये बंद झाले आणि ते भारतीय हवाई दलात वापरले जात होते.
हे देखील वाचा – 8th Pay Commission: 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुशखबर! 8 वा वेतन आयोग मंजूर, पगार कधी वाढणार? वाचा









