Jammu – Kashmir News: जम्मू-काश्मीरमधील हजरतबल दर्ग्यात राष्ट्रीय चिन्हाचे विडंबन केल्याने मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. ईद-ए-मिलाद (निमित्ताने आयोजित प्रार्थनेनंतर संतप्त झालेल्या काही लोकांनी दर्ग्यातील मुख्य प्रार्थनागृहाबाहेर राष्ट्रीय चिन्ह असलेल्या एका फलकाची तोडफोड केली. या फलकाचे अनावरण नुकतेच करण्यात आले होते.
राजकीय वाद पेटला
हजरतबल दर्ग्याच्या नूतनीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च करून नुकतेच त्याचे उद्घाटन करण्यात आले होते. जम्मू-काश्मीर वक्फ बोर्डाच्या अध्यक्षा आणि भाजप नेत्या दरख्शान अंद्राबी यांनी या नूतनीकरणाच्या कामासाठी कोणाकडूनही पैसे उधार घेतले नसल्याचे सांगितले होते.
या फलकावरील हल्ल्यानंतर अंद्राबी यांनी या कृत्याचा निषेध केला. “हा केवळ दगड फोडण्याचा प्रकार नाही, तर तो देशाच्या राष्ट्रीय चिन्हाचा अपमान आहे,” असे त्या म्हणाल्या. त्यांनी या हल्ल्याला ‘दहशतवादी हल्ला’ संबोधून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
Srinagar, J&K | A stone plaque on the reconstruction and redevelopment of the Assari Sharief Hazratbal Shrine by the Jammu & Kashmir Waqf Board, vandalised pic.twitter.com/L3vu1SzfZP
— ANI (@ANI) September 5, 2025
विरोधकांचा पलटवार
या घटनेनंतर सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स (NC) आणि इतर विरोधी पक्षांनी अंद्राबी यांच्यावर जोरदार टीका केली. NC चे मुख्य प्रवक्ते तनवीर सादिक यांनी म्हटले की, “इस्लामिक शिकवणुकीनुसार कोणत्याही धार्मिक स्थळी मूर्ती किंवा चिन्ह लावणे योग्य नाही. अंद्राबींना ही गोष्ट माहीत असायला हवी. धार्मिक भावना दुखावणे योग्य नाही.”
श्रीनगरचे खासदार अगा सय्यद रुहुल्लाह मेंहदी यांनी फलक लावण्याच्या कृत्याला ‘अहंकार’ म्हटले आहे. त्याचप्रमाणे, पीडीपी (People’s Democratic Party) नेत्या इल्तिजा मुफ्ती यांनी राष्ट्रीय चिन्ह लावण्याचा हा प्रयत्न मुस्लिमांना हेतुपुरस्सर भडकवण्यासाठी केल्याचा आरोप केला. दरम्यान, अशाप्रकारे राष्ट्रीय चिन्ह असलेले अशोक स्तंभ कोरलेले असल्यामुळे फलकाची तोडफोड करण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
जीएसटी हटवल्याने आरोग्य आणि जीवन विमा किती स्वस्त झाला? समजून घ्या गणित
200 वर्ष जुन्या सिद्धिविनायक मंदिराचा होणार विस्तार! 100 कोटींचा बंगला विकत घेणार