HDFC बँकेच्या सीईओंविरुद्ध आर्थिक फसवणुकीचे आरोप, तक्रार दाखल; नक्की प्रकरण काय?

FIR against HDFC Bank CEO Sashidhar Jagdishan

FIR against HDFC Bank CEO Sashidhar Jagdishan | HDFC बँकेचे (HDFC Bank) व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी शशीधर जगदीश (Sashidhar Jagdishan) यांच्याविरोधात आर्थिक फसवणुकीच्या आरोपांखाली एफआयआर (FIR) दाखल झाल्याने आर्थिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मात्र, बँकेने हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावत, ही कारवाई थकीत कर्ज वसुली थांबवण्यासाठी केलेली असल्याचा आरोप केला आहे.

आरोप काय आहेत?

१९९५ मध्ये HDFC बँकेकडून घेतलेले कर्ज थकवल्यानंतर मेहता कुटुंबाने लिलावती कीर्तिलाल मेडिकल ट्रस्टच्या (Lilavati Kirtilal Medical Trust) माध्यमातून शशीधर जगदीश यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदवले आहे.

HDFC बँकेच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले की, या तक्रारी सूडबुद्धीने करण्यात आल्या असून, त्या कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर करणाऱ्या व्यक्तींनी हेतूपुरस्सर रचल्या आहेत. हे आरोप दीर्घकाळ थकित कर्जाची वसुली टाळण्यासाठी केले जात आहेत.”

बँकेच्या माहितीनुसार, 31 मे 2025 पर्यंत या प्रकरणातील थकीत रक्कम व्याजासह अंदाजे 65.22 कोटी रुपये इतकी आहे. 2004 मध्ये कर्ज वसुली न्यायाधिकरणाने वसुली प्रमाणपत्र दिले असूनही रक्कम फेडलेली नाही.

लिलावती हॉस्पिटलची देखरेख करणाऱ्या ट्रस्टने HDFC बँकेच्या संचालक मंडळाला, रिझर्व्ह बँक, SEBI आणि अर्थ मंत्रालयाला पत्र लिहून शशीधर जगदीश यांना तात्काळ सर्व पदांवरून निलंबित करण्याची मागणी केली आहे.

बँकेने स्पष्ट म्हटले की, “या तक्रारींमागे वैयक्तिक हल्ला व प्रतिष्ठा डागळण्याचा प्रयत्न आहे. दीर्घकाळापासून अपयशी कर्जदारांनी आता कायदेशीर मार्ग संपल्यानंतर दबाव पद्धत वापरण्यास सुरुवात केली आहे.”

शशीधर जगदीश कोण आहेत?

शशीधर जगदीश हे HDFC बँकेचे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत. ते भारताच्या सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील कर्जदात्यांपैकी एक आहेत. त्यांनी 27 ऑक्टोबर 2020 रोजी आदित्य पुरी यांच्यानंतर ही जबाबदारी स्वीकारली.

लिलावती कीर्तिलाल मेडिकल ट्रस्टद्वारे मेहता कुटुंबाकडून त्यांच्यावर अनेक आर्थिक फसवणुकीत सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांची HDFC बँकेचे MD आणि CEO म्हणून पुनर्नियुक्तीला नुकतीच भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मंजुरी दिली आहे. आता ते 26 ऑक्टोबर 2026 पर्यंत पुढील तीन वर्षांसाठी HDFC बँकेचे MD म्हणून राहतील.