Krishna Janmabhoomi – उत्तर प्रदेशच्या मथुरेतील कृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह मशिद वादाशी संबंधित हिंदू पक्षाने केलेल्या याचिकेवर १ डिसेंबर रोजी सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केले आहे .
हिंदू पक्षाने या याचिकेद्वारे अन्य एका हिंदू पक्षकाराने केलेल्या याचिकेबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे.
या हिंदू पक्षकाराने स्वतंत्र याचिका दाखल केली असून कृष्ण जन्मस्थानावर असलेली शाही ईदगाह मशिद तेथून हटवण्याची मागणी केली आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करुन घेत याचिकाकर्त्याला सर्व कृष्णभक्तांचा प्रतिनिधी मानले. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला हिंदू पक्षाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
न्या. संजय कुमार आणि न्या .अलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी हे प्रकरण अत्यंत संवदनशील असून त्यावर सविस्तर सुनावणी घ्यावी लागेल,असे सांगून न्यायालयाने सुनावणी १ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली.
हिंदू पक्षाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ श्याम दिवान यांनी युक्तिवाद केला. कृष्ण जन्मभूमीच्या वादासंबंधी दिवाणी न्यायालयातील सर्व याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात वर्ग करण्यात आल्यानंतर हिंदू पक्षाची याचिका मुख्य असल्याचे न्यायालयाने मान्य केले होते. मात्र नंतर अन्य एका हिंदू पक्षकाराने दाखल केलेल्या याचिकेला सर्व कृष्णभक्तांचे प्रतिनिधी असे मानणे पूर्णपणे चुकीचे आहे,असे दिवान यांनी सांगितले.
हे देखील वाचा
पुण्यात अजित पवार यांचा आणखी एक भूखंड घोटाळा ? ५०० कोटींची जमीन २९९ कोटींना विकली
उद्धव ठाकरे राऊतांच्या घरी तब्येतीबाबत विचारपूस केली
माझ्यावर हल्ला झाला तर देश हलवून टाकेन; ममता बॅनर्जींचा इशारा









