High Uranium : मागच्या काही दशकांपासून भारतातील जनता बोअरवेल, ट्यूबवेल आणि हँडपंपांवर अवलंबून होती. जे पाणी बहुतेकदा थेट वाहायचे, शिवाय त्यावर बहुतांश वेळा कोणत्याही प्रक्रियेचा प्रभाव न्हवता. पण आता काळ बदला आहे. यात काही दुमत नाही. पण पाण्याचा प्रवाह देखील बदला आहे; पण तो कोणामुळे या जगातील प्रत्यक गोष्ट हि मानवनिर्मित नाही या जगातील बहुतांश बाबी या नैसर्गिक आहेत आणि पाणी हा यातील महत्वाचा घटक मानला जातो. पण आता या पाण्यावर देखील धोक्याचे संकट असल्याचे सतत बोलले जात आहे.
दिल्लीच्या भूजलातील युरेनियमची पातळी वाढल्याचे वृत्त सातत्याने पसरत आहे. दूषित नमुन्यांमध्ये पंजाब आणि हरियाणा नंतर दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर आहे. काही प्रमुख अहवालानुसार, केंद्रीय भूजल मंडळाने तयार केलेला नवीनतम वार्षिक भूजल गुणवत्ता अहवाल २०२५ काही स्पष्ट चित्र दर्शवितो. दिल्लीत चाचणी केलेल्या १३ – १५ % नमुन्यांमध्ये ३० ppb अर्थात (अब्ज भागांमध्ये एखाद्या पदार्थाचे किती भाग आहेत हे दर्शवणे) तर याच ppbच्या अनुज्ञेय मर्यादेपेक्षा जास्त युरेनियम आहे, ज्यामुळे पिण्याच्या पाण्याची सुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्याबद्दल मोठी चिंता निर्माण झाली आहे.
या नवीन अहवालत नेमकं काय?
या अहवालात भूजलसोबतच एक प्रमुख मुद्दा उपस्थित केला आहे तो म्हणजे प्रदूषणाचा या अहवालात प्रदूषणाची पातळीत सातत्याने वाढ होत असल्याचे नमूद केले आहे. २०२० मध्ये केलेल्या तपशीलवार मूल्यांकनात ११.७% नमुन्यांमध्ये उंबरठ्याच्या वरचे युरेनियम आढळले आणि दिल्लीच्या सर्वोच्च रीडिंगपैकी एक नोंदवले गेले आल्याची माहिती आहे. यामुळे युरेनियम दूषिततेच्या बाबतीत दिल्लीला देशातील सर्वात वाईट परिस्थिती असलेल्या प्रदेशांमध्ये स्थान मिळाले आहे.
या सगळ्या निष्कर्षांमुळे पर्यावरणीय गटांमध्ये कमालीची चिंता निर्माण झाली आहे. भूजलामध्ये नायट्रेट, फ्लोराईड आणि खारटपणा तसेच युरेनियमची उच्च पातळी हि अधिक चिंताजनक आहे,याचमुळे आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
केंद्रीय भूमीजल मंडळ (CGWB) अभ्यासातून राष्ट्रीय निष्कर्ष –
CGWB ने २०२४ च्या पूर्व आणि पावसाळ्यानंतरच्या कालावधीत देशभरातील ३,७५४ भूजल नमुन्यांची चाचणी केली होती. त्यात असे आढळून आले की ६.७१% मान्सूनपूर्व नमुन्यांमध्ये आणि ७.९१ % पावसाळ्यानंतरच्या नमुन्यांमध्ये युरेनियम सुरक्षित मर्यादेपेक्षा हे अधिक जास्त आहे, ज्यामध्ये पावसानंतर यामध्ये थोडीशी वाढ दिसून आली. पंजाबमध्ये सर्वाधिक प्रदूषणाची पातळी नोंदवली गेली आहे, आणि पंजाब पाठोपाठ हरियाणा आणि दिल्लीचा क्रमांक येतो. दिल्लीत, नरेलाचे औचंडी (४२ ppb) आणि कांजवालाचे निजामपूर (४६.५ ppb) दूषित होण्याचे ठिकाण म्हणून चिन्हांकित केले असल्याची माहिती आहे.
या CGWB च्या नवीन अहवालानुसार, पिण्याच्या पाण्यात युरेनियम, आर्सेनिक आणि शिसे यांच्या दीर्घकाळ संपर्कामुळे मूत्रपिंडाचे विकार, न्यूरोलॉजिकल नुकसान, कंकाल विकृती आणि कर्करोगाचा धोका अधिक वाढण्याची दाट शक्यता आहे. लोह आणि मँगनीजच्या उच्च पातळीमुळे लहान मुलांसाठी हे अधिक धोका निर्माण करू शकते. या युरेनियममुळे भूजलाची पिण्याची क्षमता कमी होते आणि माती आणि पिकांमध्ये विषारी पदार्थ साचून शेतीलाही नुकसान पोहचू शकते.
दिल्लीमध्ये सोडियम शोषण दर १७९.८ इतका नोंदवला गेला आहे, जो देशातील सर्वोच्च दरांपैकी एक मानला जातो. याने शहराला १. ११ % क्षेत्रांमध्ये स्थान दिले आहे जेथे भूजल सिंचनासाठी अयोग्य आहे आणि ७.२३ % क्षेत्रांमध्ये उच्च क्षारता किंवा विद्युत चालकता देखील नोंदवली आहे. युरेनियमयुक्त पाण्याचे सेवन, शरीराला अगदी दीर्घकाळापर्यंत हानी पोहोचवू शकते.
यामुळे शरीराला उत्त्पन्न होणारे धोके..
१. मूत्रपिंडाचे नुकसान
युरेनियमचा प्रामुख्याने मूत्रपिंडावर याचा मोठा परिणाम होतो. हे मूत्रपिंडाच्या पेशींना खोलवर नुकसान पोहोचवू शकते
२. हाडे आणि कंकालच्या समस्या
युरेनियम हाडांमध्ये जमा होण्याची शक्यता असते. हे हाडे कमकुवत करू शकतात आणि कंकालच्या विकृतींमध्ये भर घालू शकतात.
३. न्यूरोलॉजिकल प्रभाव वाढतो
दीर्घकालीन युरेनियमच्या प्रदर्शनावर परिणाम याचा अधिक परिणाम होऊ शकतो. स्मृती, एकाग्रता, वर्तन, मज्जासंस्थेचे कार्य यावर याचा प्रभाव होतो.
४. कर्करोगाचा वाढलेला धोका
दीर्घकालीन युरेनियमच्या सेवनाने काही प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो.
५. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आणि सामान्य आरोग्य समस्या वाढतात
उच्च पातळीमुळे मळमळ, उलट्या आणि पोटात जळजळ यांसारख्या गोष्टींना आमंत्रण मिळते. त्याचा यकृताच्या कार्यावर आणि रक्त रसायनशास्त्रावरही गंभीर परिणाम होऊ शकतो.
हे देखील वाचा – Union Agriculture Minister : महाराष्ट्रातील अतिवृष्टीसंदर्भात आर्थिक मदतीबाबत राज्यसरकारची बनवाबनवी?









