चीनमध्ये मुलांना जन्म देणार्‍या कुटुंबाला १.२ लाखांचे बक्षीस

china kids

बीजिंग– चीनमधील लोकसंख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यामुळे चीनच्या सरकारने देशातील जन्मदर (birth rate) वाढवण्यासाठी आणि अर्थव्यवस्था (economy)आणखी मजबूत करण्यासाठी एक अनोखी योजना आणली आहे. सरकारच्या या नव्या योजनेनुसार, १ जानेवारी २०२५ नंतर जन्माला आलेल्या मुलांच्या आई-वडिलांना सरकार प्रत्येक मुलाचे १.२ लाख रुपयाचे रोख बक्षीस देणार आहे. ही रक्कम मूल तीन वर्षांचे होईपर्यंत दिली जाणार आहे.

चीनने १० वर्षांपूर्वीच ‘एकच अपत्य ‘ हे धोरण मागे घेतले आहे. हे धोरण मागे घेऊनही चीनमधील नागरिकांनी जास्त मुले जन्माला घातलेली नाहीत.त्यामुळे चीनची लोकसंख्या (population) दिवसेंदिवस कमी होत आहे.गेल्या वर्षी चीनमध्ये केवळ ९५.४ लाख मुले जन्माला आली आहेत.चीनच्या इनर मंगोलियातील होहोट शहरात तर दुसरे मूल जन्माला घातल्यास ५० हजार युआन म्हणजेच जवळपास ६ लाख रुपये आणि तिसरे मूल जन्माला घातल्यास १२ लाख रुपयांची आर्थिक मदत पालकांना केली जात आहे.