Honda : अनेकांचं स्वप्न असत कि स्वतःची कार किंवा दुचाकी असावी त्यामुळे ते सातत्याने याबद्दल माहिती मिळवत असतात. आणि तुम्हाला देखील कार खरेदी करायची असेल तर हि बातमी ननक्की वाचा. होंडा कंपनीने आपल्या लोकप्रिय एसयूव्ही एलिव्हेटचे नवीन व्हर्जन देशात लाँच केले असून, ज्यामध्ये त्याचा आता पोर्टफोलिओ अपडेट करण्यात आला आहे. त्याचे नाव होंडा एलिव्हेट एडीव्ही एडिशन असे ठेवण्यात आले आहे.
नवीन आणि जुन्या मॉडेलपेक्षा ही अधिक स्टायलिश एडिशन म्हणून हे मॉडेल ओळखले जाणार आहे. नवीन व्हेरिएंट होंडा एलिव्हेटच्या रेंजमध्ये सर्वात वर असेल, याचा अर्थ असा की ते एलिव्हेटचे टॉप मॉडेल असणार आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने या नवीन मॉडेलमध्ये बरेच बदल देखील केले आहेत, ज्यामुळे त्याचा स्पोर्टी लूक देखील दिसतो आणि ते चांगले देखील दिसत आहे. याचे त्याचे फीचर्स आणि किंमतीबद्दल अधिक तपशील वाचा.
होंडा एलिव्हेट एडीव्ही एडिशन अलीकडेच लाँच झाली आहे. सर्वात मोठे बदल त्याच्या एक्सटीरियरमध्ये करण्यात आले असून, ज्यामुळे त्याला स्पोर्टी लूक देण्यात आला आहे. यात नारिंगी टचसह पुन्हा डिझाइन केलेला ग्रिल विभाग देखील आहे, जो फ्रंट लूकमध्ये अधिक भर घालतो.
कारच्या आतील भागात देखील बदल करण्यात आले आहेत, जिथे पूर्णपणे ऑल ब्लॅक लेआउट देण्यात आला आहे. सीट्स, डोअर पॅड आणि गिअर लीव्हरवर केशरी रंगाचे स्टिचिंग देखील करण्यात आले आहे. यामध्ये डॅशबोर्डवर विशेष एडीव्ही टेरेन पॅटर्न इल्युमिनेटेडसुद्धा आहे.
होंडा एलिव्हेटच्या एडीव्ही एडिशनमध्ये केवळ एक्सटीरियर आणि इंटिरियर बदल करण्यात आला आहे. याच्या इंजिनमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. यात होंडाचे पूर्वीचे 1.5-लीटर i-VTEC चार-सिलेंडर पेट्रोल इंजिन असणार आहे. हे इंजिन १२१ पीएस मॅक्सिमम पॉवर आणि १४५ एनएम पीक टॉर्क जनरेट करणारे आहे
होंडा एलिव्हेट एडीव्ही एडिशन दिल्लीत १५.२९ लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीसह नुकतीच लाँच करण्यात आली आहे, जी टॉप मॉडेलसाठी १६.६६ लाख रुपयांपर्यंत जाते. हे नवीन मॉडेल तीन वर्षांची अमर्यादित किलोमीटर वॉरंटी आणि एक दशकापर्यंत एनीटाइम वॉरंटी सपोर्टसह देण्यात येते.
हे देखील वाचा –
Faridabad : एका अल्पवयीन मुलीवर गोळीबार..कॅमेरात कैद झालं थरारक दृश्य!









