बंगळुरु – पहलगाम येथील पर्यटकांवर दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने केलेल्या ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor)दरम्यान भारताने पाकिस्तानची ५ लढाऊ विमाने (five Pakistani fighter jets)व एक मोठे विमान पाडल्याची माहिती वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग (Air Chief Marshal A.P. Singh)यांनी दिली.
बंगळुरु (Bengaluru)मध्ये भारताच्या हवाई हल्ल्याची माहिती देताना त्यांनी पाकिस्तानच्या मुरीदके व बहावलपूर येथील लष्कर मुख्यालयावर केलेल्या हल्ल्याच्या आधीची व नंतरची छायाचित्रे प्रसार माध्यमांना दाखवून हल्ल्याची माहिती दिली.
ते म्हणाले, भारताच्या वायू संरक्षण प्रणाली एक – ४०० च्या सहाय्याने (India’s S-400 air defence system)पाकिस्तानची पाच लष्करी (Pakistan’s military)व एक मोठे विमान पाडले. या प्रणालीच्या माध्यमातून ३०० किलोमीटर अंतरावरुन ही विमाने पाडण्यात आली. जमीनीवरुन हवेत मारा करणारा हा सर्वात मोठा हल्ला होता. यामुळे पाकिस्तानच्या विमानांना दूर ठेवण्यात यश आले. पाकिस्तानला आमची ही प्रणाली भेदता आली नाही. पाकिस्तानच्या लष्करी तळावरील हल्ल्यानंतर इथे सारे काही उद्धवस्त झाल्याचे या छायाचित्रांमधून दिसत असून त्यातील काही उपग्रहाद्वारे घेतलेली तर काही स्थानिक प्रसारमाध्यमांनी घेतलेली छायाचित्रे आहेत. यावेळी शाहबाज जैकबाबाद विमानतळावरही भारताने हल्ला केला . येथील एफ १६ विमानांचे (F-16 jets)अर्धे हँगर नष्ट करण्यात आले. मुरीदके व चकलाला येथील मुख्यालयावरही हल्ले करण्यात आले. जवळ जवळ ८० ते ९० तास चाललेल्या या युद्धात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले.