Home / देश-विदेश / पाकिस्तानच्या राजकारणात मोठ्या घडामोडी, माजी पंतप्रधान इम्रान खान यांची तुरूंगातून सुटका होण्याची शक्यता

पाकिस्तानच्या राजकारणात मोठ्या घडामोडी, माजी पंतप्रधान इम्रान खान यांची तुरूंगातून सुटका होण्याची शक्यता

Imran Khan | पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात 11 जून रोजी जामीन मिळण्याची शक्यता...

By: Team Navakal
Imran Khan

Imran Khan | पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात 11 जून रोजी जामीन मिळण्याची शक्यता आहे. खान सध्या अदियाला तुरुंगात (Adiala Jail) बंद आहेत. ते ऑगस्ट 2023 पासून विविध प्रकरणांमुळे तुरुंगवास भोगत आहेत.

पीटीआयचे (PTI) वरिष्ठ नेते गोहर अली खान यांनी सांगितले की, इस्लामाबाद उच्च न्यायालयअल-कादिर ट्रस्टमधील 190 दशलक्ष पौंडांच्या कथित गैरव्यवहारासंबंधी सुनावणी 11 जून रोजी करणार आहे. त्यात इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांच्या शिक्षा निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी दोघांनाही जामीन मिळेल, असा विश्वास गोहर यांनी व्यक्त केला.

दरम्यान, नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोने (NAB) आपला युक्तिवाद तयार करण्यासाठी वेळ मागितल्याने यापूर्वीची सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती.

गोहर अली खान यांनी स्पष्ट केले की, पीटीआय पक्ष सरकारविरोधात नवीन आंदोलन सुरू करणार असून त्याचे नेतृत्व तुरुंगात असलेले इम्रान खानच करणार आहेत. विरोधी पक्षांनी एकत्र येऊन देशाच्या सुरक्षेसाठी साथ द्यावी, असंही त्यांनी आवाहन केलं. लवकरच पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची रूपरेषा जाहीर केली जाणार आहे.

दरम्यान, खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर यांनी ईदनंतर पूर्ण ताकदीने आंदोलन छेडण्याची धमकी दिली आहे.

इम्रान खान यांनी वारंवार आरोप केला आहे की 2024 च्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर हेराफेरी झाली असून पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (PML-N) आणि पीपीपी (PPP) यांनी मतांमध्ये हेराफेरी केली आहे. त्यांनी विरोधकांना थेट “मतदारांचा कौल चोरणारे” संबोधले आहे.

तसेच, खान यांची पत्नी बुशरा बीबी यांना दबाव टाकण्यासाठी विनाचौकशी तुरुंगात ठेवण्यात आले, असा गोहर यांचा दावा आहे. खान यांच्या सुटकेसाठी कोणताही सौदा होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, इम्रान खान यांना जामीन मिळाल्यास पाकिस्तानच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळू शकतात.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या