Ind Vs Pak- आशिया चषक २०२५ स्पर्धेत भारत- पाकिस्तान सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला. पण या सामन्यादरम्यान खेळाडूंमध्ये बरंच काही घडलं होतं. भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंसोबत हात मिळवण्यास नकार दिला होता. जेव्हा-जेव्हा या दोन संघांचा सामना झाला, तेव्हा प्रचंड राजकारण तापले आहे.
या सगळ्यावर जगभरात बरीच चर्चा रंगली, दोन्ही देशांना टिकेचा सामना सुद्धा करावा लागला.
यावर अनेक देशांच्या कर्णधाराणीं देखील प्रतिक्रिया दिल्या. त्यात आता इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल अँड्र्यू अॅथरटन (Michael Andrew Atherton) यांची सुद्धा भर पडली आहे. त्यांनी आयसीसीच्या याबाबत आव्हान देखील केले आहे. भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत पुन्हा एकदा गंभीरपणे विचार करण्याचा सल्ला देखील त्यांनी आयसीसीला दिला आहे.
भारत-पाक सामन्यावर बंदीची मागणी :
ही भूमिका नुकत्याच रंगलेल्या वादावरून समोर आली आहे. या स्पर्धेदरम्यान दोन्ही देशांतील तणाव आणि बिघडलेले संबंध स्पष्ट दिसले. खेळाडूंनी हात न मिळवणे, बॅटने वादग्रस्त इशारे करणे, ट्रॉफी स्वीकारण्यास नकार देणे,अशा अनेक घटना वारंवार घडल्या. अॅथरटन यांच्या मते, क्रिकेट आता ‘क्रीडा राजनय’चे माध्यम राहिले नाही, तर दोन्ही देशांतील तणावाचे प्रतिबिंब बनले आहे. केवळ आर्थिक फायद्यासाठी अशा सामन्यांचे आयोजन करणे तात्काळ थांबवावे, तसेच भविष्यातील आयसीसी स्पर्धांसाठी पारदर्शक ड्रॉ प्रणाली ठेवावी, असे देखील त्यांनी सुचवले आहे.
Michael Atherton said, "After the Asia Cup fiasco, India–Pakistan games should not be scheduled at ICC events." (The Times) pic.twitter.com/QrxrnjHhri
— Sheri. (@CallMeSheri1_) October 6, 2025
ह्या संपूर्ण सामन्यात भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला होता; मात्र हा संपूर्ण टूर्नामेंट चुकीच्या कारणांसाठी लक्षात राहिला. पहलगाव दहशतवादी हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर मैदानावरही तणाव वाढला होता. ह्या वादाची ठिणगी पडली 14 सप्टेंबरला, जेव्हा सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला.
त्यानंतर साहिबजादा फरहानने अर्धशतक झळकावल्यानंतर बॅटने वादग्रस्त इशारा देखील केला होता. शिवाय; सामन्यात हारिस रौफ,फहीम अशरफ यांनी देखील भारतीय खेळाडूंविरुद्ध उचकावणारे हावभाव केले. जेवढी हि स्पर्धा वादग्रस्त ठरली तेव्हडाच तिचा शेवटही वादग्रस्त ठरला. कारण; भारताने पाकिस्तानचे गृहमंत्री आणि एसीसी-पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला.
शेवटी अॅथरटन यांनी ट्विट करत लिहल कि, आयसीसी स्पर्धांमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यांना आर्थिक आणि राजनैतिक कारणांमुळे प्राधान्य दिले जाते. पण आता वेळ आली आहे की ही प्रथा थांबवावी. दोन्ही देशांतील संबंध सतत बिघडत आहेत आणि अशा पार्श्वभूमीवर हे सामने जाणूनबुजून आयोजित करणे योग्य नाही. यावर आता आयसीसी कोणता मोठा निर्णय घेणार हे पाहन महत्वाचं ठरेल.
टॉस फिक्सिंग? भारत-पाकिस्तान सामन्यात नक्की काय घडले? मॅच रेफरीकडून मोठी चूक
रोहित-विराट मैदानात कधी खेळताना दिसणार? जाणून घ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजचे वेळापत्रक