India Condemns Pakistan UNHRC: भारताने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (UNHRC) पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला आहे. पाकिस्तानने आपल्याच खैबर पख्तूनख्वा प्रांतात केलेल्या हवाई हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारताने सडकून टीका केली.
या हल्ल्यात 10 नागरिकांसह 24 लोकांचा मृत्यू झाला होता. भारताने पाकिस्तानला आपल्या अंतर्गत संकटांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे.
At the 60th Session of the Human Rights Council, Kshitij Tyagi, Counsellor, Permanent Mission of India, Geneva, said, "…A delegation that epitomises the antithesis of this approach continues to abuse this forum with baseless and provocative statements against India. Instead of… pic.twitter.com/Os4Sipx7Jg
— ANI (@ANI) September 23, 2025
भारताचा UNHRC मध्ये पाकिस्तानवर हल्लाबोल
भारताचे जिनेव्हा येथील स्थायी मिशनचे सल्लागार क्षितिज त्यागी म्हणाले की, “एक शिष्टमंडळ जे या दृष्टिकोनाचा पूर्णपणे विरोध करते, ते भारतावर निराधार आणि चिथावणीखोर विधाने करून या मंचाचा गैरवापर करत आहे.”
त्यागी पुढे म्हणाले, “आमच्या प्रदेशावर नजर ठेवण्याऐवजी, त्यांनी त्यांच्या बेकायदेशीर ताब्यात असलेला भारतीय भूभाग रिकामा करावा आणि आर्थिक संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्था, लष्कराच्या वर्चस्वाखालील राजकारण आणि दहशतवादाला आश्रय देण्यासारख्या मानवाधिकार उल्लंघनांवर लक्ष केंद्रित करावे.”
पाकिस्तानी हवाई दलाने (Pakistan Air Force – PAF) खैबर पख्तूनख्वामधील एका दुर्गम खेड्यावर बॉम्ब हल्ला केला होता. तिराह खोऱ्यात तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP), इस्लामिक स्टेट खोरासन प्रांतात (ISKP) आणि लश्कर-ए-इस्लामसारखे अनेक बंडखोर आणि दहशतवादी गट सक्रिय आहेत.
पाकिस्तानमधील प्रतिक्रिया
पाकिस्तानी हवाई दल आणि सरकारने आपले नेमका लक्ष्य काय होते, यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. पाकिस्तानच्या एका दैनिकातील अहवालानुसार, खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर यांनी सांगितले की, दहशतवाद्यांविरोधात लढाऊ विमाने वापरणे हा लष्कराचा घटनात्मक अधिकार आहे आणि त्याला रोखण्यासाठी प्रांतीय सरकार काहीही करू शकत नाही.
दरम्यान, पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाने (Human Rights Commission of Pakistan) या घटनेचा निषेध केला असून या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे.
हे देखील वाचा – Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुनावणी ९ ऑक्टोबरला