Home / देश-विदेश / अमेरिकेने इराणवरील हल्ल्यासाठी भारतीय हवाई हद्द वापरली का? सत्य काय? सरकारने केले स्पष्ट

अमेरिकेने इराणवरील हल्ल्यासाठी भारतीय हवाई हद्द वापरली का? सत्य काय? सरकारने केले स्पष्ट

US Iran Conflict | अमेरिकेने इराणच्या 3 अणु-केंद्रांवर हल्ले केले होते. ऑपरेशन मिडनाइट हॅमर अंतर्गत अमेरिकेने इराणच्या फोर्डो, नतांझ आणि...

By: Team Navakal
US Iran Conflict

US Iran Conflict | अमेरिकेने इराणच्या 3 अणु-केंद्रांवर हल्ले केले होते. ऑपरेशन मिडनाइट हॅमर अंतर्गत अमेरिकेने इराणच्या फोर्डो, नतांझ आणि इस्फाहान या अणु-केंद्रांवर हवाई हल्ले केले. यासाठी सहा बी-2 बॉम्बर विमानांचा वापर करण्यात आला होहात. हे हवाई हल्ले करण्यासाठी भारतीय हवाई हद्दीचा वापर केल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात होता. मात्र, भारताने हा दावा खोटा अससल्याचे स्पष्ट केले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या तीन अणु-केंद्रांवर ऑपरेशन मिडनाइट हॅमर अंतर्गत हल्ले केल्यानंतर या अफवा पसरल्या होत्या. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या (PIB) फॅक्ट चेक युनिटने हा दावा खोटा असल्याचे सांगितले आहे.

अमेरिकेने इराणवर हल्ले केल्यानंतर काही समाजमाध्यम खात्यांनी दावा केला की, ‘ऑपरेशन मिडनाइट हॅमर’ दरम्यान अमेरिकेच्या विमानांनी इराणवर हल्ला करण्यासाठी भारतीय हवाई हद्देचा वापर केला. या दाव्याला खोडून काढताना PIB फॅक्ट चेकने ‘एक्स’ (X) वर पोस्ट करत म्हटले, “हा दावा पूर्णपणे बनावट आहे. अमेरिकेने भारतीय हवाई हद्देचा वापर केलेला नाही.” असे स्पष्ट केले आहे.

PIB चे स्पष्टीकरण

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या PIB फॅक्ट चेक युनिटने या दाव्याची पडताळणी केली. युनिटने स्पष्ट केले की, अमेरिकेच्या विमानांनी इराणवर हल्ला करताना भारतीय हवाई हद्देचा वापर केला गेला नाही. PIB ने असेही नमूद केले की, अमेरिकेच्या जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल डॅन केन यांनी पत्रकार परिषदेत हल्ल्यासाठी वापरलेल्या मार्गांचे तपशील दिले होते. त्यांच्या स्पष्टीकरणानंतरही सोशल मीडियावर अफवा पसरवली जात आहे.

भारताची भूमिका

भारताने या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट करताना कोणत्याही चुकीच्या माहितीला बळी पडू नये, असे आवाहन केले आहे. PIB फॅक्ट चेकने नागरिकांना सोशल मीडियावरील माहितीची खातरजमा करण्याचा सल्ला दिला आहे. भारताने या हल्ल्यांशी आपला कोणताही संबंध नसल्याचे सांगितले असून, आंतरराष्ट्रीय शांततेसाठी संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या