Home / देश-विदेश / आता परदेशातही ‘मेक इन इंडिया’! ‘या’ देशात उभारला गेला भारताचा पहिला संरक्षण उत्पादन प्रकल्प

आता परदेशातही ‘मेक इन इंडिया’! ‘या’ देशात उभारला गेला भारताचा पहिला संरक्षण उत्पादन प्रकल्प

India first overseas defence plant in Morocco: भारताच्या संरक्षण उत्पादनाला अधिक बळकटी मिळणार आहे. लवकरच परदेशातही भारताचा पहिला संरक्षण उत्पादन...

By: Team Navakal
India first overseas defence plant in Morocco

India first overseas defence plant in Morocco: भारताच्या संरक्षण उत्पादनाला अधिक बळकटी मिळणार आहे. लवकरच परदेशातही भारताचा पहिला संरक्षण उत्पादन प्रकल्प सुरू होणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 22 ते 23 सप्टेंबरदरम्यान उत्तर आफ्रिकन देश मोरोक्कोच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत.

या ऐतिहासिक दौऱ्यात ते मोरोक्कोमधील भारताच्या पहिल्या परदेशी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन करतील. एखाद्या भारतीय संरक्षण मंत्र्याचा मोरोक्को दौरा करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

भारताचा पहिला परदेशी संरक्षण प्रकल्प

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मोरोक्कोतील कॅसाब्लांका येथे टाटा ॲडव्हान्स सिस्टिम्स लिमिटेडच्या (TASL) प्रकल्पाचे अनावरण करतील. हा प्रकल्प मोरोक्कोच्या रॉयल आर्म्ड फोर्सेसच्या (Royal Armed Forces) भागीदारीत उभारण्यात आला आहे.

या प्रकल्पात व्हिल्ड आर्मर्ड प्लॅटफॉर्म (WhAP) 8×8 ची निर्मिती केली जाईल. डीआरडीओ (DRDO) आणि टीएएसएलने संयुक्तपणे विकसित केलेले हे एक उभयचर इन्फंट्री कॉम्बॅट व्हेइकल (Infantry Combat Vehicle) आहे, जे कोणत्याही प्रकारच्या भूभागात काम करण्यास सक्षम आहे. हे 8 चाकी वाहन भारतीय सैन्यातही कार्यरत आहे. गेल्या वर्षी मोरोक्कोने टाटा ग्रुपसोबत या वाहनाच्या निर्मितीसाठी करार केला होता.

संरक्षण मंत्रालयाच्या एका निवेदनानुसार, “हा आफ्रिकेतील भारताचा पहिला संरक्षण उत्पादन प्रकल्प असून, ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांतर्गत भारतीय संरक्षण उद्योगाची वाढती जागतिक ओळख दर्शवणारा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.”कारखान्यात दरवर्षी 100 लढाऊ वाहने तयार केली जातील, ज्यासाठी सुमारे 350 लोकांना रोजगार मिळेल.

राजनाथ सिंह यांच्या दौऱ्याचे उद्दिष्ट

दौऱ्यादरम्यान राजनाथ सिंह मोरोक्कोचे राष्ट्रीय संरक्षण मंत्री अब्देलातीफ लुदीयी (Abdellatif Loudiyi) यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. या भेटीत संरक्षण, रणनीती आणि औद्योगिक सहकार्याला बळ देण्यावर भर दिला जाईल.

याशिवाय, ते मोरोक्कोचे उद्योग आणि व्यापार मंत्री र्‍याद मेझौर (Ryad Mezzour) यांचीही भेट घेतील. भारत आणि मोरोक्कोदरम्यान संरक्षण सहकार्यासाठी एका सामंजस्य करारावरही (MoU) स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा –  Amazon Sale: Samsung च्या ‘या’ स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट; हजारो रुपयांची होईल बचत

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या