Home / देश-विदेश / मोठी झेप! भारताची आर्थिक ताकद वाढली, आता जपानला मागे टाकून जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था 

मोठी झेप! भारताची आर्थिक ताकद वाढली, आता जपानला मागे टाकून जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था 

India becomes $4 trillion economy, surpasses Japan | भारताने जपानला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा टप्पा गाठला...

By: Team Navakal
India becomes $4 trillion economy, surpasses Japan

India becomes $4 trillion economy, surpasses Japan | भारताने जपानला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा टप्पा गाठला आहे. याबाबत नीती आयोगाद्वारे माहिती देण्यात आली.

नीती आयोगाचे (NITI Aayog) मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रमण्यम (B.V.R. Subrahmanyam) यांनी सांगितले की, भारताने जपानला मागे टाकत चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था (fourth largest economy) बनण्याचा टप्पा गाठला आहे. दिल्लीमध्ये झालेल्या नीती आयोगाच्या 10 व्या नियामक परिषदेच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

“भारताची अर्थव्यवस्था 4 ट्रिलियन डॉलर्सच्या पातळीवर पोहोचली आहे,” असे सांगत सुब्रमण्यम यांनी IMF च्या आकडेवारीचा आधार देऊन याबाबत माहिती दिली. भारत आता केवळ अमेरिका (United States), चीन (China) आणि जर्मनी (Germany) या तिघांनंतर चौथ्या क्रमांकावर आहे.

या यशाचे श्रेय त्यांनी भारतातील अनुकूल भौगोलिक-राजकीय आणि आर्थिक परिस्थितीला दिले. “आपण जर सातत्याने योग्य दिशा आणि नियोजन राखले, तर पुढील 2.5 ते 3 वर्षांत भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होऊ शकतो,” असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

सुब्रमण्यम यांनी जागतिक व्यापार घडामोडींचा संदर्भ देत, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयफोन संदर्भातील विधानावर भाष्य केले. “ट्रम्प यांचे म्हणणे की आयफोन अमेरिकेतच तयार व्हायला हवा, हे व्यापाराच्या गतिशीलतेचे उदाहरण आहे. मात्र, भारतसारखे देश अजूनही उत्पादनासाठी खर्चिकदृष्ट्या फायदेशीर पर्याय राहतील,” असे ते म्हणाले. त्यांनी भारताला जागतिक पुरवठा साखळीसाठी एक मजबूत आणि विश्वासार्ह केंद्र म्हणून अधोरेखित केले.

Web Title:
For more updates: , , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या