पहलगाम हल्ल्यातील ‘त्या’ गटाला अमेरिकेने केले ‘दहशतवादी’ संघटना घोषित, भारताने केले निर्णयाचे स्वागत

pahalgam Attack

Pahalgam Attack | जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये (Pahalgam Attack) झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यामागील द रेसिस्टन्स फ्रंट (The Resistance Front) या संघटनेला अमेरिकेने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे. अमेरिकेने हा निर्णय घेत पाकिस्तानला दणका दिला आहे. अमेरिकेच्या या निर्णयाचं भारताने स्वागत केलं आहे.

भारताने हा निर्णय भारत-अमेरिका दहशतवादविरोधी सहकार्याची मजबूत पुष्टी मानली आहे, ज्यामुळे भारताच्या शून्य सहनशीलता धोरणाला आणखी बळ मिळालं आहे.

परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचे ट्विट आणि भारताची भूमिका

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी एक्सवर पोस्ट करत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ आणि त्यांच्या विभागाचे आभार मानले. त्यांनी म्हटलं की, TRF ला (TRF Terrorist Group) परदेशी दहशतवादी संघटना आणि विशेषतः नियुक्त जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करणं हे भारत-अमेरिका सहकार्याचं उदाहरण आहे.

TRF ही लष्कर-ए-तैयबाशी संबंधित संघटना आहे. या संघटनेने 22 एप्रिलच्या पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. परराष्ट्र मंत्रालयानेही याला जागतिक सहकार्याचं महत्त्वाचं पाऊल मानलं असून, दहशतवादी हस्तकांवर कारवाईसाठी आंतरराष्ट्रीय भागीदारांसोबत काम सुरू ठेवण्याचा भारताचा निर्धार व्यक्त केला.

त्याआधी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी TRF ला ‘परदेशी दहशतवादी संघटना’ आणि ‘विशेषतः नियुक्त जागतिक दहशतवादी’ या यादीत समाविष्ट करण्याच्या स्टेट डिपार्टमेंटच्या निर्णयाची घोषणा केली. हे ट्रम्प प्रशासनाचे राष्ट्रीय सुरक्षा हितांचे रक्षण करणे, दहशतवादाचा मुकाबला करणे आणि पहलगाम हल्ल्यातील न्यायासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या आवाहनाची अंमलबजावणी करण्याचे वचन दर्शवते, असे निवेदनात म्हटले आहे.

शिष्टमंडळाचे यश

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान स्थित दहशतवाद्यांवर कारवाई केली होती. यानंतर भारताने या मोहिमेबाबत जगभरातील देशांना माहिती देण्यासाठी शिष्टमंडळ पाठवले होते. काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या शिष्टमंडळाने वॉशिंग्टनमध्ये उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर आता अमेरिकेने टीआरएफला दहशतवादी संघटना घोषित केले आहे.

हे देखील वाचा –

विधानभवनात राडा! जितेंद्र आव्हाड-गोपीचंद पडळकर कार्यकर्त्यांत हाणामारी, देवेंद्र फडणवीस म्हणाले…

Air India Plane Crash: एअर इंडिया विमान अपघातात पायलटचा हात? अमेरिकी वृत्तपत्राच्या दाव्यावर AAIB ने दिले उत्तर