India US Trade Deal : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. त्यांची वारंवार भारतावरील वक्तव्य चांगलीच गाजत आहे. मागच्या काही काळात त्यांनी बरेच निर्णय घेतले. जगभरातील अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात आयातशुल्क देखील लादलं. भारतावरही एकूण ५० टक्के आयातशुल्क त्यांनी लादलेलं आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे सध्या भारताला अमेरिकेत वस्तू निर्यात करण्यासाठी एकूण ५० टक्के टॅरिफ भरावा लागत आहे. अमेरिकेच्या या निर्णयाचा भारताच्या अर्थव्यवस्थेला मात्र मोठा फटका बसत आहे.
एवढ्यावरच न थांबता ट्रम्प यांनी अनेकदा भारताला लक्ष केलं आहे. त्यांची विरोधाभासी भूमिका वारंवार समोर येत आहे. मात्र, भारत अमेरिकेच्या कोणत्याही दबावाला भरीस पडला नाही . यानंतर सध्या डोनाल्ड ट्रम्प हे नरमल्याचं पाहायला मिळत आहे. आता लवकरच भारत आणि अमेरिकेत यांमध्ये व्यापार करार होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेलं ५० टक्के आयातशुल्क अमेरिका कमी करणार असल्याचं वृत्त सध्या समोर आलं आहे.
काही वृत्तानुसार, भारत आणि अमेरिका आयातीवरील शुल्क १५ ते १६ टक्क्यांपर्यंत कमी करण्यासाठी व्यापार कराराच्या जवळ पोहोचले आहेत अशी माहिती या वृत्तामधून समोर आली आहे. मागील काही महिन्यांपासून भारत आणि अमेरिकेतील व्यापार करार बराच काळ रखडला आहे. मात्र, दीर्घकाळापासून रखडलेला हा व्यापर करार आता लवकरच पूर्ण होणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. भारतीय आयातीवरील अमेरिकन शुल्क ५० टक्क्यांवरून १५ ते १६ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात येणार असल्याचं देखील काही वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, ऊर्जा आणि शेतीवर अवलंबून असलेल्या या करारामुळे भारत हळूहळू रशियन कच्च्या तेलाची आयात कमी करू शकतो, असंही काही अहवालात म्हटलं गेलं आहे. मात्र, यावर अद्याप भारताकडून अधिकृत अशी पुष्टी करण्यात आली नाही. ट्रम्प यांनी काही काळापूर्वी एक विधान केलं होत. ज्यात ते बोलतात ‘त्यांनी पंतप्रधान मोदींशी चर्चा केली. ही चर्चा मुख्यत्वे व्यापारावर केंद्रित चर्चा होती. यावेळी मोदींनी त्यांना आश्वासन दिलं की भारत रशियाकडून तेल खरेदी मर्यादित करेल’, असा दावा देखील त्यांनी केला होत.
आता पर्यंतचा इतिहास पाहता ट्रम्प यांची विरोधाभासी वक्तव्य पाहता त्यांच्यावर कितपत विश्वास ठेवावा हा एक मोठा प्रश्न आहे. भारत आणि अमेरिकेच्या कराराविषयी आगामी काळात नक्कीच पुष्टी होईल, ह्या फक्त चर्चा आहेत कि यात काही तथ्यता आहे हे पाहणं सुद्धा तितकच महत्वाचं ठरेल.
हे देखील वाचा –
Bhaubeej 2025 : भाऊबीज का साजरी केली जाते; जाणून घ्या या मागील धार्मिक कथा..