India Women’s Team : वोग इंडिया या भारतातील फॅशन आणि डिझाईन क्षेत्रावरील अग्रगण्य मासिकाच्या मुखपृष्ठावर विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघातील चार महिला खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. कर्णधार हरमनप्रित कौर, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा व प्रतिका रावल यांचे अत्याधुनिक डिझायनर पेहरावातील छायाचित्र असलेले मुखपृष्ठ वोग इंडियाने आपल्या इन्टाग्राम अकाऊंटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. या छायात्रित्राला नेटकऱ्यांनीही भरभरुन प्रतिसाद दिला आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकून एका रात्रीत भारतीय महिला क्रिकेटचा कायापालट केला आहे. त्याचबद्दल त्यांचा सन्मान म्हणून वोगने त्यांना आपल्या मुखपृष्ठावर स्थान दिले आहे. या छायाचित्रात त्यांच्या चेहऱ्यावर असणारा आत्मविश्हीवास या छायाचित्रानंमध्ये स्पष्ट दिसत आहे. या चौघींचाही ड्रेस सुप्रसिद्ध डिझायनर दिव्या बालक्रिष्णन हिने डिझाईन केले आहेत. त्याचे छायाचित्रकार जॅकी नायक आहेत. या छायाचित्राबरोबर टाकलेल्या पोस्टमध्ये वोगने त्यांच्या सन्मानार्थ म्हटले की, जेव्हा तुमच्यावर खूप लोकांचा प्रचंड विश्वास असतो तेव्हा तुम्ही वेगळ्याच उत्सहात खेळता. तुम्ही खेळलात आणि जिंकलात. तुम्ही भारतीय महिला क्रिकेटचे भविष्य पुन्हा लिहिलेत. काही वर्षांपूर्वी जेव्हा मुली हळूच लपून मुलांचे क्रिकेट सामने पाहायच्या, आज त्यांना त्यांची जागा मिळाली आहे.
व्होगच्या या अंकात या चारही क्रिकेटपटूंनी विश्वचषक व महिला क्रिकेटविषयी आपले अनुभवही व्यक्त केले आहेत. या इन्टाग्राम पोस्टवर नेटकऱ्यांनी या चौघींच्या खेळाचे, त्यांच्या या नव्या लुकमधील दिसण्याचे भरभरुन कौतुक केले आहे. व्होगच्या मुखपृष्टावरील त्यांच्या फोटोबरोबर आम्ही इथे थांबणार नाही या अर्थाच्या इंग्रजी ओळीही छापण्यात आलेल्या आहेत.
हे देखील वाचा – IRCTC New Rules : एक्सप्रेस मेलच्या ऑनलाईन तिकीट बुकिंग नियमांमध्ये मोठा बदल









