Home / देश-विदेश / ‘राजकीय अटींमुळे ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताने काही विमाने गमावली’, नौदल अधिकाऱ्याच्या दाव्याने राजकारण तापले

‘राजकीय अटींमुळे ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताने काही विमाने गमावली’, नौदल अधिकाऱ्याच्या दाव्याने राजकारण तापले

Operation Sindoor | भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अलीकडील लष्करी संघर्षात (Operation Sindoor) भारताने काही लढाऊ विमाने गमावली, अशी माहिती इंडोनेशियातील...

By: Team Navakal
Operation Sindoor

Operation Sindoor | भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अलीकडील लष्करी संघर्षात (Operation Sindoor) भारताने काही लढाऊ विमाने गमावली, अशी माहिती इंडोनेशियातील भारताचे संरक्षण अधिकारी कॅप्टन शिव कुमार यांनी दिली आहे. जकार्ता येथील एका सेमिनारमध्ये बोलताना ही दिली. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकारण तापले असून, काँग्रेसने सरकारवर जोरदार टीका केली आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान भारताने सुरुवातीला केवळ दहशतवादी तळांवर हल्ले करण्याचे आदेश दिले होते, परंतु नंतर रणनीती बदलून लष्करी तळांवर हल्ले केल्याने भारताने हवेत वर्चस्व मिळवले, असेही शिव कुमार यांनी सांगितले.

22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने 7 मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. या मोहिमेदरम्यान भारतीय हवाई दलाने दहशतवादी तळांवर लक्ष केंद्रित केले होते. मात्र, जकार्ता येथील सेमिनारमध्ये इंडोनेशियाच्या एका एरोस्पेस तज्ज्ञाने दावा केला की, भारताने तीन राफेल, एक मिग-29, एक सुखोई-30 आणि एक टॅक्टिकल ड्रोन गमावले, तर पाकिस्तानने भारताचे दोन S-400 लाँचर निष्क्रिय केले.

यावर कॅप्टन कुमार यांनी स्पष्ट केले की, “इतक्या विमानांचे नुकसान झाल्याचा दावा अतिशयोक्तीपूर्ण आहे, पण काही नुकसान झाले हे खरे आहे. हे नुकसान राजकीय नेतृत्वाच्या लष्करी तळांवर हल्ला न करण्याच्या आदेशामुळे झाले.”

कॅप्टन कुमार यांनी सांगितले की, सुरुवातीच्या नुकसानानंतर भारताने आपली रणनीती बदलली. शत्रूच्या हवाई संरक्षण प्रणालीचे नुकसान करून आणि लष्करी तळांवर हल्ले करून भारताने 8, 9 आणि 10 मे रोजी हवेत पूर्ण वर्चस्व मिळवले.

“आम्ही सरफेस-टू-एअर आणि सरफेस-टू-सरफेस क्षेपणास्त्रांचा वापर करून यशस्वी हल्ले केले,” असे ते म्हणाले. या यशामुळे भारताने शत्रूच्या संरक्षण यंत्रणेला कमकुवत करत अचूक हल्ले केले.

संरक्षण मंत्रालय आणि दूतावासाची प्रतिक्रिया

जकार्ता येथील भारतीय दूतावासाने कॅप्टन कुमार यांच्या विधानांचा चुकीचा अर्थ लावला गेल्याचे निवेदन जारी केले. निवेदनात म्हटले आहे की, “भारतीय सशस्त्र सेना नागरी राजकीय नेतृत्वाच्या अंतर्गत काम करतात. ‘ऑपरेशन सिंदूर’चा उद्देश दहशतवादी तळांना लक्ष्य करणे होता आणि भारताची प्रतिक्रिया कमीत कमी वाढवणारी होती.”

काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

काँग्रेसने या प्रकरणावर सरकारवर टीका केली आहे. काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी विचारले की, “ऑपरेशन सिंदूरवर सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन का बोलावले नाही?” त्यांनी सरकारच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

दुसरीकडे, भारताचे एअर मार्शल ए.के. भारती यांनी 11 मे रोजी सांगितले होते की, भारतीय हवाई दलाने पाकिस्तानची अत्याधुनिक लढाऊ विमाने पाडली आणि आपले वैमानिक सुरक्षित परतले. याशिवाय, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनीही 31 मे रोजी सिंगापूरमध्ये काही रणनीतिक चुकांमुळे नुकसान झाल्याचे मान्य केले, परंतु त्यात सुधारणा करून भारताने यश मिळवल्याचे सांगितले होते.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या