Operation Keller | ऑपरेशन सिंदूर पाठोपाठ भारतीय लष्कराकडून दहशतवादाविरोधात ऑपरेशन केलर (Operation Keller) राबवण्यात आले आहे. भारतीय लष्कराने (Indian Army) काल (१३ मे) काश्मीरमधील शोपियान (Shopian) जिल्ह्यातील केलरच्या घनदाट जंगल परिसरात लष्कर-ए-तैयबाच्या (Lashkar-e-Taiba) तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.
‘ऑपरेशन केलर’ (Operation Keller) असे नाव असलेली ही कारवाई राष्ट्रीय रायफल्स युनिटला (Rashtriya Rifles Unit) शोएकल केलर भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल मिळालेल्या अचूक गुप्त माहितीनंतर सुरू करण्यात आली.
OPERATION KELLER
— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) May 13, 2025
On 13 May 2025, based on specific intelligence of a #RashtriyasRifles Unit, about presence of terrorists in general area Shoekal Keller, #Shopian, #IndianArmy launched a search and destroy Operation. During the operation, terrorists opened heavy fire and fierce… pic.twitter.com/KZwIkEGiLF
भारतीय लष्कराने ‘एक्स’ (X) वर पोस्ट केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, “ऑपरेशन केलर. १३ मे २०२५ रोजी राष्ट्रीय रायफल्स युनिटच्या विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारावर, शोएकल केलर, शोपियान भारतीयसेना यांनी शोध आणि नष्ट करण्याची मोहीम सुरू केली. या कारवाईदरम्यान, दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार सुरू केला आणि चकमक झाली, ज्यात तीन कट्टर दहशतवादी मारले गेले. ऑपरेशन सुरू आहे.”
मिळालेल्या माहितीनुसार, ही चकमक शेजारील कुलगाम जिल्ह्यात (Kulgam district) सुरू झाली आणि शोपियानपर्यंत पसरली, जिथे जोरदार गोळीबारात दहशतवाद्यांना ठार करण्यात आले.
‘ऑपरेशन केलर’विषयी माहिती:
सुरक्षा दलांनी ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख शाहिद कुट्टय, अदनान शफी दार आणि हारिस नाझीर अशी पटवली असून, हे सर्व पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाशी संबंधित होते.
शाहिद कुट्टय हा शोपियानच्या चोटीपोरा हेरपोराचा रहिवासी अआहे. ८ मार्च २०२३ रोजी तो लष्कर-ए-तैयबामध्ये सामील झाला होता. तो अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सामील होता, ज्यात ८ एप्रिल २०२४ रोजी डॅनिश रिसॉर्टवर झालेल्या गोळीबाराचा समावेश आहे, ज्यात दोन जर्मन पर्यटक जखमी झाले होते. १८ मे २०२४ रोजी हेरपोरामध्ये एका भाजप सरपंचाच्या हत्येमध्येही त्याचा सहभाग होता आणि ३ फेब्रुवारी २०२५ रोजी कुलगामच्या बेहिबागमध्ये प्रादेशिक सैन्याच्या जवानाच्या हत्येमध्ये त्याचा संशय होता.
अदनान शफी दार हा शोपियानच्या वांदुना मेलहोराचा रहिवासी असून तो ऑक्टोबर २०२४ मध्ये लष्कर-ए-तैयबामध्ये सामील झाला होता. त्याने त्याच महिन्यात वाची, शोपियान येथे एका बिगर-स्थानिक मजुराची हत्या केली होती.
हारिस नाझीर, जो पुलवामाचा रहिवासी होता, त्याचाही एप्रिल २०२४ च्या डॅनिश रिसॉर्ट हल्ल्यात सहभाग होता घटनास्थळावरून तीन एके-४७ रायफल्स (AK-47 rifles) आणि इतर शस्त्रे व दारुगोळा जप्त करण्यात आला, ज्यामुळे या गटाची प्रदेशात दहशतवादी कारवाया सुरू ठेवण्याची तयारी असल्याचे स्पष्ट होते.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर ‘ऑपरेशन केलर’
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या सीमावर्ती तणावाच्या दरम्यान ही चकमक झाली. यापूर्वी ७ मे रोजी भारताने पाकिस्तान आणि पाक-व्याप्त काश्मीरमधील (PoK) नऊ दहशतवादी ठिकाण्यांना लक्ष्य करत ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) ही मोठी दहशतवादविरोधी कारवाई केली होती.
भारतीय गुप्तचर यंत्रणांनी पहलगाम हल्ल्यासाठी पाकिस्तानस्थित तीन दहशतवादी आदिल हुसेन ठोकेर, अली भाई आणि हाशिम मुसालाजबाबदार धरले आहे, ज्यांचे “दहशतवादमुक्त काश्मीर” (Terror-Free Kashmir) असे लेबल असलेले पोस्टर्स शोपियानमध्ये लावण्यात आले आहेत.