Home / देश-विदेश / इराण-इस्त्रायलमधील संघर्ष वाढला, तेहरानमधील भारतीयांना दूतावासाचा ‘सुरक्षित ठिकाणी जाण्याचा’ सल्ला

इराण-इस्त्रायलमधील संघर्ष वाढला, तेहरानमधील भारतीयांना दूतावासाचा ‘सुरक्षित ठिकाणी जाण्याचा’ सल्ला

Israel-Iran conflict | मध्यपूर्व प्रदेशात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, इराणमधील भारतीय दूतावासाने) तेहरानमधील सर्व भारतीय नागरिक आणि पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर्स (PIOs)...

By: Team Navakal
Israel-Iran conflict
Social + WhatsApp CTA

Israel-Iran conflict | मध्यपूर्व प्रदेशात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, इराणमधील भारतीय दूतावासाने) तेहरानमधील सर्व भारतीय नागरिक आणि पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर्स (PIOs) यांना शहरातून बाहेर पडत सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेहरानमधील सर्व नागरिकांना “तात्काळ स्थलांतरित” करण्याचे आवाहन केल्यानंतर लगेचच हा इशारा देण्यात आला आहे. गेल्याकाही दिवसांपासून इराण-इस्त्रायलमधील संघर्ष वाढला आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर जोरदार हल्ले केले जात आहेत. त्यातच आता भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला आहे.

“जे भारतीय नागरिक आणि PIOs आपल्या स्वतःच्या साधनांनी तेहरानमधून बाहेर पडू शकतात, त्यांना शहराबाहेर सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला जातो,” असे दूतावासाने ‘एक्स’ (ट्विटर) पोस्टमध्ये म्हटले आहे. ज्या भारतीयांनी अद्याप दूतावासाशी संपर्क साधलेला नाही, त्यांना तात्काळ संपर्क साधून त्यांचे सध्याचे ठिकाण आणि संपर्क क्रमांक कळवण्याचे निर्देशही दूतावासाने दिले आहेत.

“जे भारतीय नागरिक तेहरानमध्ये आहेत आणि दूतावासाच्या संपर्कात नाहीत, त्यांना तात्काळ भारतीय दूतावासाशी संपर्क साधून त्यांचे ठिकाण आणि संपर्क क्रमांक देण्याची विनंती करण्यात येत आहे,” असे आणखी एका पोस्टमध्ये म्हटले होते. यासाठी +989010144557, +989128109115 आणि +989128109109 हे तीन क्रमांक देण्यात आले होते.

दरम्यान, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांकडून सलग पाचव्या दिवशी हवाई हल्ले आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरू असल्याने, इस्रायल आणि इराण या दोन्ही ठिकाणी 24×7 नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) स्थापन करण्यात आले आहेत.

त्याआधी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या नागरिकांना तेहरानमधून बाहेर पडण्याचे आवाहन केले होते. अणुबॉम्ब निर्मिती रोखण्यासाठीच्या कराराला इराणने नकार दिल्याचे कारण त्यांनी दिले.

“इराणने मी त्यांना सांगितलेला ‘करार’ स्वीकारायला हवा होता. किती लाजिरवाणे आणि मानवी जीवनाची हानी! स्पष्टपणे सांगायचे तर, इराणला अणुबॉम्ब ठेवता येणार नाही. मी हे वारंवार सांगितले आहे! प्रत्येकाने तात्काळ तेहरान रिकामे करावे!” असे ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले होते. त्यानंतर तेहरानमध्ये अनेक ठिकाणी स्फोटांचे आवाज ऐकू आले.

Web Title:
संबंधित बातम्या