Home / देश-विदेश / Iran Crisis Indian Advisory: इराणमधील भारतीयांना ४८ तासांचा ‘अलर्ट’! घरातच राहण्याचे आवाहन; ट्रम्प यांच्या धमकीने तणाव वाढला

Iran Crisis Indian Advisory: इराणमधील भारतीयांना ४८ तासांचा ‘अलर्ट’! घरातच राहण्याचे आवाहन; ट्रम्प यांच्या धमकीने तणाव वाढला

Indian embassy advisory Iran 48 hours alert : मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती आता अत्यंत गंभीर वळणावर पोहोचली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड...

By: Team Navakal
Iran Crisis Indian Advisory
Social + WhatsApp CTA

Indian embassy advisory Iran 48 hours alert : मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती आता अत्यंत गंभीर वळणावर पोहोचली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर, भारताने इराणमध्ये असलेल्या आपल्या नागरिकांसाठी तातडीची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. भारतीय दूतावासाने सर्व भारतीयांना पुढील ४८ तास ‘जिथे आहात तिथेच राहा’ असा सल्ला दिला आहे.

भारतीय दूतावासाची महत्त्वाची नियमावली

तेहरानमधील भारतीय दूतावासाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, इराणमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांनी पुढील किमान ४८ तास घराबाहेर पडू नये. विशेषतः लष्करी तळ, वीज प्रकल्प आणि बहुमजली इमारतींच्या वरच्या मजल्यांवर जाणे टाळावे. जर कोणाला महामार्गावरून प्रवास करायचा असेल, तर त्यांनी आधी दूतावासाशी समन्वय साधणे अनिवार्य आहे.

दूतावासाच्या सूचना खालीलप्रमाणे:

  • सुरक्षित स्थळी राहा: जे भारतीय दूतावासाने ठरवून दिलेल्या हॉटेलमध्ये किंवा निवासस्थानी आहेत, त्यांनी आतच राहावे आणि सतत अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहावे.
  • हे टाळा: वीज केंद्रे आणि लष्करी ठिकाणांपासून लांब राहावे, कारण युद्धाच्या परिस्थितीत ही ठिकाणे लक्ष्य केली जाऊ शकतात.
  • संपर्कात राहा: दूतावासाचे आपत्कालीन क्रमांक २४ तास सुरू असून नागरिकांनी अधिकृत अपडेट्सवर लक्ष ठेवावे.

९,००० भारतीयांचे भवितव्य टांगणीला

अधिकृत आकडेवारीनुसार, २८ फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू झाले तेव्हा इराणमध्ये सुमारे ९,००० भारतीय नागरिक होते, ज्यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत जवळपास १,८०० भारतीय मायदेशी परतले आहेत, मात्र अद्यापही मोठी संख्या तिथेच अडकलेली आहे.

ट्रम्प यांची ‘डेडलाईन’ आणि धोका

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी भारतीय वेळेनुसार बुधवार पहाटे ५:३० पर्यंतची मुदत दिली आहे. “जर इराणने ही मागणी मान्य केली नाही, तर आज रात्री मोठी कारवाई होईल,” अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी ही पावले उचलली आहेत.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या