Indian Man Shot Dead in USA: अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये 30 वर्षीय भारतीय तरुण मोहम्मद निजामुद्दीन याची पोलिसांच्या गोळीबारात हत्या झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. तेलंगणामधील महबूबनगर जिल्ह्यातील रहिवासी असलेला निजामुद्दीन या वर्षी 3 सप्टेंबर रोजी सांता क्लारा येथे एका वादातून मारला गेला, असे त्याच्या वडिलांनी म्हटले आहे.
नेमके काय घडले?
इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, मोहम्मद निजामुद्दीनचे वडील मोहम्मद हसनुद्दीन यांनी सांगितले की, त्यांच्या मुलाची रुममेटसोबत बाचाबाची झाल्यानंतर हा प्रकार घडला. मात्र, नेमक्या कोणत्या परिस्थितीत पोलिसांकडून गोळीबार झाला, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. हसनुद्दीन यांना त्यांच्या मुलाच्या मृत्यूची माहिती एका मित्राकडून मिळाली.
#WATCH | Mahabubnagar, Telangana: A family from Mahabubnagar city is seeking assistance from the Indian and Telangana state governments to bring back the body of their son, Mohammad Nizamuddin, who was allegedly killed in a police shootout in California, USA, where he had gone… pic.twitter.com/Zl8Y6BGOaa
— ANI (@ANI) September 19, 2025
वडिलांची परराष्ट्रमंत्र्यांकडे धाव
मोहम्मद हसनुद्दीन यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांना एक पत्र लिहून आपल्या मुलाचा मृतदेह मायदेशी परत आणण्यासाठी मदत करण्याची विनंती केली आहे.
‘आज सकाळी मला कळले की माझ्या मुलाला सांता क्लारा पोलिसांनी गोळ्या घालून ठार केले आहे आणि त्याचा मृतदेह सांता क्लारा, कॅलिफोर्निया येथील एका हॉस्पिटलमध्ये आहे. पोलिसांनी त्याला नेमके का मारले, याची खरी कारणे मला माहित नाहीत,’ असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. हसनुद्दीन यांनी भारतीय दूतावासाला मदत करण्याचे आवाहन केले आहे.
राजकीय पक्षाकडूनही मदत
तेलंगणामधील Majlis Bachao Tehreek (MBT) या पक्षाचे प्रवक्ते अमजद उल्लाह खान यांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर) वर याबद्दल माहिती पोस्ट करून भारत सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.
निजामुद्दीन अमेरिकेला मास्टर्स पदवी घेण्यासाठी गेला होता आणि तिथे तो सॉफ्टवेअर प्रोफेशनल म्हणून काम करत होता, अशी माहितीही त्यांनी दिली.
हे देखील वाचा – लाडकी बहीण योजनेत मोठा बदल; 2 महिन्यात करा ‘हे’ काम; अन्यथा पैसे बंद