Home / देश-विदेश / Abu Dhabi Attack: अबुधाबीमध्ये क्षेपणास्त्र हल्ल्याच्या अवशेषांमुळे भारतीय नागरिकाचा मृत्यू; आतापर्यंत 7 नागरिकाचा दुर्दैवी अंत

Abu Dhabi Attack: अबुधाबीमध्ये क्षेपणास्त्र हल्ल्याच्या अवशेषांमुळे भारतीय नागरिकाचा मृत्यू; आतापर्यंत 7 नागरिकाचा दुर्दैवी अंत

Indian national killed in Abu Dhabi missile debris : पश्चिम आशियातील युद्धाची धग आता संयुक्त अरब अमिरातीपर्यंत (UAE) पोहोचली असून...

By: Team Navakal
Indian national killed in Abu Dhabi missile debris
Social + WhatsApp CTA

Indian national killed in Abu Dhabi missile debris : पश्चिम आशियातील युद्धाची धग आता संयुक्त अरब अमिरातीपर्यंत (UAE) पोहोचली असून यामध्ये एका भारतीय नागरिकाला आपला जीव गमवावा लागला आहे. गुरुवारी अबुधाबीमधील स्वैहान स्ट्रीटवर क्षेपणास्त्र हल्ल्याचे अवशेष पडल्याने झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये एक भारतीय आणि एक पाकिस्तानी नागरिक आहे. या घटनेमुळे आखाती देशांमधील युद्धाच्या भीषणतेने आतापर्यंत एकूण 7 भारतीयांचा बळी घेतला आहे.

नेमकी घटना काय?

अबुधाबीच्या हवाई संरक्षण यंत्रणेने (Air Defence System) इराणकडून येणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हवेतच यशस्वीपणे नष्ट केली. मात्र, या नष्ट केलेल्या क्षेपणास्त्रांचे अवशेष शहरातल्या गजबजलेल्या रस्त्यावर पडल्याने ही जीवितहानी झाली. अबुधाबी मीडिया ऑफिसने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत 3 जण जखमी झाले असून त्यामध्येही एका भारतीय व्यक्तीचा समावेश आहे. जखमींमध्ये एमिराती आणि जॉर्डनच्या नागरिकांचाही समावेश असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

भारतीय दूतावासाकडून मदत

यूएईमधील भारतीय दूतावासाने या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृत भारतीय नागरिकाच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतानाच, दूतावासाने स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधला असून पीडित कुटुंबाला सर्वतोपरी मदत केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

भारतीयांवरील संकटाची मालिका

पश्चिम आशियातील संघर्षात अडकून भारतीयांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ नाही. आकडेवारीनुसार:

  1. 13 मार्च: ओमानमधील सोहार शहरात झालेल्या ड्रोन हल्ल्यात 2 भारतीयांचा मृत्यू झाला होता.
  2. मालवाहू जहाजे: व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांमध्ये यापूर्वी 3 भारतीय खलाशांना आपला जीव गमवावा लागला आहे.
  3. 18 मार्च: सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू झाला होता.
  4. ताजी घटना: गुरुवारच्या घटनेसह आतापर्यंत मृतांचा आकडा 7 वर पोहोचला असून 1 भारतीय अद्याप बेपत्ता आहे.

यूएईच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, इराणकडून येणाऱ्या धोक्यांना तोंड देण्यासाठी त्यांची हवाई संरक्षण यंत्रणा सज्ज आहे. मात्र, युद्धाच्या या धामधुमीत सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या