Home / देश-विदेश / देशभरातील 6,115 रेल्वे स्टेशनवर मोफत इंटरनेटची सुविधा, कसे वापराल मोफत Wi-Fi? जाणून घ्या सोपी पद्धत

देशभरातील 6,115 रेल्वे स्टेशनवर मोफत इंटरनेटची सुविधा, कसे वापराल मोफत Wi-Fi? जाणून घ्या सोपी पद्धत

Indian Railways Free Wi-Fi

Indian Railways Free Wi-Fi: भारतीय रेल्वेने (Indian Railways) भारत सरकारच्या डिजिटल इंडिया (Digital India) कार्यक्रमाअंतर्गत देशभरातील 6,115 रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सुविधा उपलब्ध केली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी राज्यसभेतएका लेखी निवेदनात ही माहिती दिली.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले, “भारतीय रेल्वेच्या जवळपास सर्व स्थानकांवर दूरसंचार सेवा पुरवठादारांकडून 4G/5G कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे. प्रवासी डेटा कनेक्टिव्हिटीसाठी या नेटवर्कचा वापर करत आहेत. याशिवाय, 6,115 रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सुविधाही पुरवण्यात आली आहे.”

मोफत वायफायची सुविधा असलेल्या रेल्वे स्थानकांची यादी

देशातील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध आहे. यात काही प्रमुख स्थानके खालीलप्रमाणे आहेत:

  • मुंबईतील स्थानके: मुंबई सेंट्रल, पुणे, कल्याण.
  • दिल्लीतील स्थानके: हजरत निजामुद्दीन, आनंद विहार टर्मिनल, नवी दिल्ली, दिल्ली जंक्शन.
  • इतर महत्त्वाची स्थानके: सुरत, अहमदाबाद, वडोदरा, राजकोट, अंबाला कॅंट, रोहतक, गुरुग्राम, शिमला, जम्मू तवी, श्री माता वैष्णो देवी कटरा, रांची, धनबाद, मंगळूर सेंट्रल, बंगळूर, भोपाळ, उज्जैन, इंदूर, भुवनेश्वर, पुरी, अमृतसर, जालंधर, लुधियाना, चेन्नई सेंट्रल, हैदराबाद, सिकंदराबाद जं., अलाहाबाद, गोरखपूर, हावडा, सियालदह.

वायफाय कसे कनेक्ट कराल?

रेल्वे प्रवाशांना स्थानकावर मोफत वायफायचा वापर करून हाय-डेफिनिशन (HD) व्हिडिओ पाहता येतात, चित्रपट, गाणी किंवा गेम डाऊनलोड करता येतात, तसेच ऑनलाइन ऑफिसची कामेही करता येतात.

वायफाय कनेक्ट करण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा:

  1. तुमच्या स्मार्टफोनवर वायफाय मोड चालू करा.
  2. उपलब्ध नेटवर्कच्या यादीमधून “RailWire” नेटवर्क निवडा.
  3. तुमचा मोबाइल नंबर टाका. तुम्हाला एसएमएसद्वारे एक वन-टाइम पासवर्ड (OTP) मिळेल.
  4. ओटीपी (OTP) टाकून पडताळणी करा आणि हाय-स्पीड इंटरनेट वापरा.

ही वायफाय सेवा रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या रेलटेल (RailTel) या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमामार्फत दिली जात आहे.