Home / देश-विदेश / Video: वाघासोबत सेल्फी काढण्याचा मोह पडला महागात! थायलंडमध्ये भारतीय पर्यटकासोबत पुढे काय घडले पाहाच

Video: वाघासोबत सेल्फी काढण्याचा मोह पडला महागात! थायलंडमध्ये भारतीय पर्यटकासोबत पुढे काय घडले पाहाच

Tiger Attack Viral Video | थायलंडच्या (Thailand) फुकेत येथील टायगर किंगडम (Tiger Kingdom) या प्रसिद्ध पर्यटनस्थळी एका भारतीय पर्यटकावर वाघाने...

By: Team Navakal
Tiger Attack Viral Video

Tiger Attack Viral Video | थायलंडच्या (Thailand) फुकेत येथील टायगर किंगडम (Tiger Kingdom) या प्रसिद्ध पर्यटनस्थळी एका भारतीय पर्यटकावर वाघाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाघासोबत सेल्फीघेण्याचा प्रयत्न करत असताना हा प्रकार घडला असून, याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलहोत आहे.

25 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये संबंधित पर्यटक वाघासमोर चालताना दिसतो आणि काही क्षणांतच त्याच्याजवळ फोटोसाठी थांबतो. त्या वेळी एक प्रशिक्षक वाघाला स्थिर करण्यासाठी छडीचा वापर करत असतो. परंतु अचानक वाघ आक्रमक होतो आणि त्या व्यक्तीवर झडप घालतो. या घटनेत त्या पर्यटकाला किरकोळ दुखापत झाली असून, तो थोडक्यात बचावला.

एका सोशल मीडिया यूजरने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या घटनेनंतर टायगर किंगडमसारख्या पर्यटन स्थळांमधील सुरक्षा मानकांवर आणि प्राण्यांच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया

या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर अनेकांनी अशी ठिकाणे कितपत सुरक्षित आहेत, याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. एका यूजरने लिहिले की, “अशा स्टंटपासून दूर राहा. प्राणी म्हणजे प्राणीच. त्यांच्याशी आदराने वागा, पण त्यांच्याकडून माणसासारख्या प्रतिक्रिया अपेक्षू नका.”

दुसऱ्या व्यक्तीने नमूद केले, “अशा धोकादायक कृती जीवघेण्या ठरू शकतात. पर्यटन करताना सावधगिरी बाळगणे आणि वन्य प्राण्यांच्या ताकदीचा आदर करणे गरजेचे आहे.”

काही लोकांनी असेही मत व्यक्त केले की, पिंजऱ्यात ठेवलेल्या प्राण्यांचा मानवी संपर्क धोकादायक ठरू शकतो, कारण त्यांचे नैसर्गिक वर्तन त्या परिस्थितीत बदलू शकते.

अशीच घटना यापूर्वी अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यातील कोहेनजिक प्राणीसंग्रहालयात (घडली होती. एका महिलेने वाघाच्या पिंजऱ्यावर चढून वाघाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हाही वाघाने महिलेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या