Home / देश-विदेश / परकीय गंगाजळी वाढली ६९६ अब्ज डॉलरवर पोहचली

परकीय गंगाजळी वाढली ६९६ अब्ज डॉलरवर पोहचली

नवी दिल्ली – रिझर्व्ह बॅंकेने (Reserve Bank of India)१३ जून रोजी जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, ६ जून २०२५ रोजी संपलेल्या...

By: Team Navakal
foreign exchange reserves

नवी दिल्ली – रिझर्व्ह बॅंकेने (Reserve Bank of India)१३ जून रोजी जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, ६ जून २०२५ रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा ५.१७ अब्ज डॉलर्सने (billion dollars)वाढून ६९६.६५६ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये देशाची परकीय गंगाजळी ७०४.८९ अब्ज डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर होती. आताची ही परकीय गंगाजळी उच्चांकी पातळीपासून फक्त १.२ टक्के दूर आहे.
भारताची परकीय चलन हे ६ जून रोजीसंपलेल्या आठवड्यात ३.४७२ अब्ज डॉलर्सने वाढून ५८७.६८७ अब्ज डॉलर्सवर पोहोचली. ३० मे रोजी संपलेल्या मागील आठवड्यात, परकीय चलन भांडवलात १.२३ अब्ज डॉलर्सची घट झाली होती. आरबीआयच्या ताज्या आकडेवारीनुसार, ३० मे ते ६ जून दरम्यान देशाच्या सोन्याच्या साठ्यातही लक्षणीय वाढ झाली आहे. सोन्याचा साठा १.५८३ अब्ज डॉलरने वाढून ८५.८८८ अब्ज डॉलरवर पोहचला आहे. २०१२ पासूनच्या रिझर्व्ह बॅंकेच्या एकूण परकीय चलन साठ्यातील सोन्याचा वाटा जवळपास दुप्पट झाला आहे. जागतिक मध्यवर्ती बँकांकडून ‘सुरक्षित गुंतवणूक ‘ म्हणुन सोन्याच्या खरेदीतील वाढ हे यामागील नेमके कारण असल्याचे सांगितले जात आहे.

Web Title:
संबंधित बातम्या